Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४७ कोरोनाबाधितांची वाढ; २२८ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 10:47 AM2020-12-12T10:47:15+5:302020-12-12T10:48:12+5:30

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८२ जणांची प्रकृती चिंताजनक

Corona virus: 247 new corona patients on friday in pune city | Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४७ कोरोनाबाधितांची वाढ; २२८ रुग्ण झाले बरे

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४७ कोरोनाबाधितांची वाढ; २२८ रुग्ण झाले बरे

Next

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात २४७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ९३ झाली आहे.   
 
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १९ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५३० झाली आहे. पुण्याबाहेरील ४ मृत्यूची नोंद करण्यात आली.
 
शुक्रवारी दिवसभरात एकूण २२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार ७७९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७३ हजार ४०२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ९३ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७९४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ५६ हजार ५९५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus: 247 new corona patients on friday in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.