Corona virus : पुण्यात आत्तापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू : जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०९ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:45 AM2020-04-10T11:45:51+5:302020-04-10T11:47:05+5:30

पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ

Corona virus : 25 corona iffected patients deaths in Pune: District number at patient 209 | Corona virus : पुण्यात आत्तापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू : जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०९ वर 

Corona virus : पुण्यात आत्तापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू : जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०९ वर 

Next
ठळक मुद्देमृत्यू पावलेले सातही रुग्ण हे इतर आजाराने देखील त्रस्त

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या तासा-तासाने वाढत असताना, गुरूवारी मात्र ही वाढ आटोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे शहरात ३ एप्रिलपासून नित्याने दहा-वीस रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु, गुरुवारी हे ही संख्या १२ वर आली आहे. यात मृत्यूचे सत्र अजून थांबले नसून गुरुवारी नव्याने ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले सातही रुग्ण हे इतर आजाराने देखील त्रस्त होते. 
 पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले़ गेल्या तीन-चार दिवसात हा आकडा वाढत असतानाच आज प्रथमच नव्याने संसर्ग झालेल्यांची संख्या कमी झाल्याचे आढळून आली आहे़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेकडो डॉक्टरांच्या पथकांमार्फत प्रत्येक घरामध्ये जाऊन तपासणीचे काम चालू सद्यस्थितीला चालू आहे़ पुणे शहरात ८ एप्रिलपर्यंत जे रूग्ण आढळून आले आहेत, त्यामध्ये  ढोले पाटील वार्डमध्ये १२, नगररस्ता येथे १, घोले रोड येथे ५, येरवडा येथे ८, औंध येथे ३, कोथरूड येथे १, सिंहगड रस्ता येथे ५, वारजे येथे १, धनकवडी येथे १२, हडपसर येथे ११, कोंढवा येथे ९, वानवडी येथे ३, कसबा पेठ येथे २३, बिबवेवाडी येथे ४ व सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे भवानी पेठ परिसरात आढळून आले असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या ही ४५ आहे़ 
 पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये अधिक असल्याने हा सर्व भाग सील करण्यात आला असून, येथे प्रत्येक घरात कोरोना संसगार्बाबत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे़ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या एकूण ६६२ जणांना आजपर्यंत विविध विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते़ तर ३२३ जणांना त्यांच्या घरीच होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते़ अशा एकूण ९८५ जणांना आत्तापर्यंत क्वारंटाईन करण्यात आले असून, यापैकी अनेकांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे़ सध्या पुणे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ११८ कोरोनाबाधित उपचार घेत असून, ससून हॉस्पिटलमध्ये ही संख्या ३९ इतकी आहे़ 
    शहरात आत्तापर्यंत १ हजार ८१५ संशयितांना तपासणीसाठी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते़ यापैकी १ हजार ५९४ जणांचा तपासणी अहवाल हा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले़ तर कोरोनाची लागण झालेल्या व उपचारानंतर पूर्णत: बरे झालेल्या १८ जणांना घरी सोडण्यात आले आहे़ यामध्ये नायडू हॉस्पिटलमधून १६ जणांना, सह्याद्री हॉस्पिटलमधून १ व भारती हॉस्पिटलमधून एका जणांचा समावेश आहे़  सद्यस्थितीला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एक रूग्ण असून त्याची प्रकृती गंभीर आहे़

Web Title: Corona virus : 25 corona iffected patients deaths in Pune: District number at patient 209

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.