Corona virus : पुणे शहरात शनिवारी २५४ तर पिंपरीत २६७ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 08:42 PM2020-12-12T20:42:31+5:302020-12-12T20:42:53+5:30
पुणे शहरात दिवसभरात ३१७ कोरोनाबाधितांची वाढ : ६ रुग्णांचा मृत्यू
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३१७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १५० झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०३ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५३६ झाली आहे. पुण्याबाहेरील ३ मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवसभरात एकूण २५४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ३३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७३ हजार ७१९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १५० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७७१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ६० हजार ३६६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
.............
पिंपरीत १६० जण नवे कोरोना रुग्ण
पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत असून दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात आज एकही कोरोनाचा बळी गेला नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध रुग्णालयात ३ हजार ०३८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ६३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १०६४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात ३ हजार १२३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७९७ वर पोहोचली आहे.
..............................
कोरोनामुक्त वाढले
मागील आठवड्यात शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दीडपटीने रुग्ण कोरानामुक्त होत आहे. परिसरातील २६७ जण कोरोनामुक्त झाले. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ०३२ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार २६८ वर पोहोचली आहे. मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७१६ वर पोहोचली आहे.