Corona virus : पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २७ गावांमध्ये संचारबंदी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:46 PM2020-04-21T16:46:35+5:302020-04-21T16:47:24+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कडक संचारबंदी जाहीर
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध कठोर पावले उचलली जात आहे. त्याच अनुषंगाने शहरातील संपूर्ण परिसर पूर्णत: सील करण्यात आले असून पर्यायी मार्गही बंद केले आहे. पोलीस यंत्रणांनी किराणा, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील ठराविक वेळ उपलब्ध करुन दिली आहे. परंतु,आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा वेग वाढू न देण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रूग्ण सापडलेल्या पाच तालुक्यातील एकूण २७ गावांमध्येसुध्दा संचारबंदी जाहीर केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच पुढील तालुक्यांमधील गावेही सील करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा आदेश या गावांसाठी लागू असणार आहे
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा वेग वाढू न देण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रूग्ण सापडलेल्या पाच तालुक्यातील एकूण २७ गावांमध्येसुध्दा संचारबंदी जाहीर केली आहे. ज्या गावात कोरोना संशयित वा बाधित रुग्ण आढळून आले आहे अशा गावांचा त्यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण सापडलेले भाग सील करत करत सोमवारपासून पूर्ण शहरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरु केली आहे . प्रशासनाच्या माहितीनुसार, रूग्णांच्या जवळच्या व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे लागलीच आढळून येत नाहीत. किंबहुना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अनेक जण स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे.
.....................
प्रतिबंधीत करण्यात आलेले क्षेत्र
संपूर्ण पुणे महापालिका हद्द
संपूर्ण पिंपरी चिंचवड महापालिका हद्द
संपूर्ण बारामती नगरपरिषद हद्द
हवेली तालुका - जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नर्हे, खानापूर, लोणीकंद, उरुलिकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी
शिरूर - विठ्ठल वाडी, शिक्रापूर
वेल्हा - निगडे , मोसे
भोर - नेरे
जुन्नर - डिंगोरे..