Corona virus : पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ३०२ तर पिंपरीत १३८ जणांना कोरोना संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 09:32 PM2020-12-16T21:32:34+5:302020-12-16T21:33:07+5:30

पुणे शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ९५२ झाली आहे.  

Corona virus : 302 people were infected with corona on Wednesday In Pune city and 138 in Pimpri | Corona virus : पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ३०२ तर पिंपरीत १३८ जणांना कोरोना संसर्ग 

Corona virus : पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ३०२ तर पिंपरीत १३८ जणांना कोरोना संसर्ग 

googlenewsNext

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात ३०२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ९५२  झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७४ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. यातील २२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५५६ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

दिवसभरात एकूण २९३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार २४६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ७५४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ९५२ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६९९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७२ हजार २७८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
......... 
औद्योगिकनगरीतील १३८ जणांना कोरोना संसर्ग 
पिंपरी : औद्योगिकनगरीतील विविध भागातील १३८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून १११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर २ हजार ७६३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
 
गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.  रुग्णसंख्या दोनशेच्या आत आली आहे. महापालिका परिसरातील रुग्णालयात २ हजार ७९२ जणांना दाखल केले होते. त्यापैैकी २ हजार ३६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १ हजार ९६४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. महापालिका रुग्णालय, जम्बो कोवीड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ७२९ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आजपर्यंत ९४ हजार ७७७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
 ........................
डिस्चार्ज प्रमाण वाढले
पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकुण ९१ हजार ४९३ जण बरे होऊन घरी गेले आहेत.  दिवसभरात २ हजार ७९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
.......................

Web Title: Corona virus : 302 people were infected with corona on Wednesday In Pune city and 138 in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.