Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ३०८ नवीन रुग्णांची भर; एकूण रुग्णांची संख्या ८१३४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 12:58 PM2020-06-03T12:58:04+5:302020-06-03T13:02:18+5:30

बाप रे ! एकाच दिवसांत सर्वाधिक २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Corona virus : 308 new corona patients affected in one day in Pune district; total patient number on 8134 | Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ३०८ नवीन रुग्णांची भर; एकूण रुग्णांची संख्या ८१३४ वर

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ३०८ नवीन रुग्णांची भर; एकूण रुग्णांची संख्या ८१३४ वर

Next
ठळक मुद्देतब्बल १६९ रुग्ण झाले बरे : १६५ अत्यवस्थ तर २५ रूग्णांचा मृत्यूशहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार ७९५ वर

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि.२) रोजी एकाच दिवसांत २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१३४ झाली असून, एकूण मृत्यू ३६७ झाले आहेत. 
शासनाने लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. मंगळवारी एका दिवसांत ३०८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ पुणे शहरामध्ये आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये ३१ व ग्रामीण भागात १३ नवीन रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागात नव्याने सापडत असलेले बहुतेक रूग्ण मुंबईतून आपल्या गावी आलेले आहेत किंव त्याच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. यामुळे ग्रामीण भागात ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात त्या भागावर आता अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. 

शहरात दिवसभरात २६६ रूग्णांची वाढ

 शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार ७९५ वर जाऊन पोचला असून मंगळवारी दिवसभरात २६६ रूग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात बरे झालेल्या १६९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण २ हजार ३३१ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २६६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात मंगळवारी २५ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३४५ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२८ रुग्ण, ससूनमधील ०२ तर  खासगी रुग्णालयांमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ११९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३३१ झाली आहे.

__

एकूण बाधित रूग्ण : ८१३४
पुणे शहर : ६८५७
पिंपरी चिंचवड : ५५७
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ७२०
मृत्यु : ३६७
बरे झाले :४९२१

Web Title: Corona virus : 308 new corona patients affected in one day in Pune district; total patient number on 8134

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.