Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३५० कोरोना रुग्ण झाले बरे; ३७३ ची नवीन वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 06:52 PM2020-10-31T18:52:59+5:302020-10-31T18:53:47+5:30
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३७३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५७६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ६१२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २४५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार ५४२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.
दिवसभरात १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार २२७ झाली आहे. दिवसभरात एकूण ३५० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५१ हजार ४९५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार ३३४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ६१२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ५२६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख ३६ हजार ८७८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.