Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत तब्बल ३५८ नवीन रूग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार १६७

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:55 PM2020-05-22T22:55:28+5:302020-05-22T23:06:42+5:30

आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 167 एवढी

Corona virus : 358 new Corona patient was fount in Pune district; The number of corona 5 thousands167 | Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत तब्बल ३५८ नवीन रूग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार १६७

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत तब्बल ३५८ नवीन रूग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार १६७

Next
ठळक मुद्देदिवसभरात 358 नवीन रुग्णांची भर तर 15 बळीशहरात १६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्तसद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये १ हजार ७८६ कोरोनाबाधित रूग्ण घेत आहे उपचारकोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही पुणे शहरात देशाच्या व राज्याच्या तुलनेत अधिक

पुणे : शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळाखा आणखी घट्ट होताना दिसत असून, शुक्रवारी एका दिवसांत तब्बल ३५८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर १५ व्यक्तींचा मृत्यु झाला. यामुळे आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ हजार १६७ झाली आहे. 
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे.
---- 
शहरातील आजपर्यंतची सर्वाधिक वाढ : तब्बल २९१ कोरोनाबाधित रूग्ण..

शहरातील कंटन्मेंट झोनमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याची मोहिमच महापालिकेने हाती घेतली असून, दररोज दीड ते पावणे दोन हजार नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. परिणामी सौम्य लक्षणे असलेले रूग्णही अधिकाधिक प्रमाण उजेडात येऊ लागले असून, शुक्रवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या तपासणी अहवालापैकी, तब्बल २९१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. पुणे शहरात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
    दुसरीकडे शहरातील कोरोनाबाधितांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले असून, आज एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे १६८ रूग्ण कोरोनामुक्तही घरी परतले आहेत. यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या ही आता २ हजार ३७१ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही पुणे शहरात देशाच्या व राज्याच्या तुलनेत अधिक असून, ही टक्केवारी निम्म्याहून अधिक म्हणजे ५३़९० टक्के इतकी आहे. 
कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र अद्यापही कायम असून, देशाच्या व राज्याच्या तुलनेत हा दर पुणे शहरात जास्त आहे़ परंतु़, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण, उपचार घेणाºयांची संख्या यांची तुलना करता मृत्यूचे प्रमाण हे तुलनेने कमीच आहे़
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ७३५ कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यापैकी महापालिकेच्या नायडू व आयसोलेशन सेंटरमध्ये २४७, ससून हॉस्पिटलमध्ये ९ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ३५ जणांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
    सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये १ हजार ७८६ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी १६८ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४९ जण व्हेंटिलेटरवर आहे.

एकूण बाधित रूग्ण : 5167
पुणे शहर : 4471
पिंपरी चिंचवड : 253
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 443
मृत्यु : 257

 

Web Title: Corona virus : 358 new Corona patient was fount in Pune district; The number of corona 5 thousands167

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.