Corona virus : पुणे शहरात रविवारी ३७७ नवे कोरोनाबाधित : तर २४० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 11:14 AM2020-11-02T11:14:00+5:302020-11-02T11:18:12+5:30
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ३९ हजार ४६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे .
पुणे : शहरात रविवारी ३७७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये ८ जण पुण्याबाहेरील आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ५७९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ३३५ जण व्हेंटिलेटरवर आहेत.तर १ हजार ५१४ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. सध्या आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ही हजाराच्या पुढे असली तरी, त्यांना आवश्यक असलेल्या आॅक्सिजनची मागणी ही खूपच कमी झाली आहे.
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ३९ हजार ४६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.यापैकी १ लाख ६१ हजार ७११ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५१ हजार ७३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ७३२ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरात २ हजार ५८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
---------------------------------