Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ४८९ कोरोनाबाधितांची वाढ तर ६८१ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 21:43 IST2020-10-16T21:42:32+5:302020-10-16T21:43:04+5:30
आत्तापर्यंत १ लाख ४२ हजार ३६९ जण कोरोनामुक्त

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ४८९ कोरोनाबाधितांची वाढ तर ६८१ कोरोनामुक्त
पुणे : पुणे शहरात शुक्रवारी ४८९ कोरोनाबाधिताची वाढ झाली असून, ६८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १५ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवभरात ३ हजार ३९३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, शहरातील एकूण चाचणीची संख्या ही ६ लाख ९५ हजार ५४९ इतकी झाली आहे.
शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये सध्या ८३८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४४६ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४२३ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही १० हजार ३२३ इतकी असून, आत्तापर्यंत १ लाख ४२ हजार ३६९ जण कोरोनामुक्त झालेले आहेत.