Corona virus: पुणे शहरात दिवसभरात ५९५ नवीन कोरोनाबधित;एकूण रुग्णसंख्या १३ हजार ९९४ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:07 AM2020-06-27T02:07:35+5:302020-06-27T02:09:02+5:30
विविध रुग्णालयात उपचार घेणारे 330 रुग्ण अत्यवस्थ
पुणे : शुक्रवारी पुणे शहरात दिवसभरात कोरोना बाधित ५९५ रूग्णांची वाढ झाली असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १३ हजार ९९४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ३३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ३३० रुग्ण अत्यवस्थ असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही ५ हजार ५७५ इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५९५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ३४३ तर खासगी रुग्णालयांमध्ये २३७ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
शहरात शुक्रवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५७२ झाली आहे. दिवसभरात एकूण ३३१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २५६ रुग्ण, ससूनमधील १० तर खासगी रुग्णालयांमधील ६५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ६३३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ३७८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.