Corona virus : पुणे विभागात ८९० कोरोना बाधित रुग्ण; ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले : डॉ.दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:49 PM2020-04-21T21:49:23+5:302020-04-21T21:53:57+5:30
पुणे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सवलत नाही...
पुणे: पुणे विभागातील ५ जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ८९० झाली आहे. विभागात ११५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण ७१७ आहेत. विभागात आतापर्यंत कोरोनाबाधीत एकुण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. उर्वरीत रूग्ण निरीक्षणाखाली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील बाधित रूग्णांची संख्या ८१३ आहे.५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सातारा - १६ बाधित, मृत्यू - २
सोलापूर - २५ बाधित, मृत्यू - २
सांगली - २७ बाधित, मृत्यू - १
कोल्हापूर - ९ बाधित.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण १० हजार ३७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ९ हजार ५११ चा अहवाल मिळाला. त्यातील ८ हजार ५७३ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. ८९० चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ४४ लाख ५ हजार ३६९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात १ कोटी ६७ लाख ७७ हजार ६४९ जणांची तपासणी झाली. त्यापैकी ८२८ जणांना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे.
...........
पुणे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सवलत नाही
राज्य सरकारने कोरोना लॉकडाऊन मधून काही क्षेत्रातील ऊद्योगांना दिलेली सवलत पुणे महानगर क्षेत्रात मात्र नाकारण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामधील सर्व ऊद्योगांची स्थिती आता आहे तशीच राहील. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.
या क्षेत्रामध्ये फक्त मेडीसीन, एलपीजी यासारख्या अत्यावश्यक सेवां, ज्यांना १७ एप्रिल पूर्वी परवानगी देण्यात आली आहे त्याच सेवा सुरू राहतील. या उद्योगांच्या व्यवस्थापनानेही त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यांच्या कामगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर ठिकाणी कुठेही जाण्याची परवानगी दिली जाणार नाही