Corona virus : पुणे जिल्ह्यात बुधवारी 98 रूग्ण वाढले ; कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 232 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:25 AM2020-05-14T11:25:44+5:302020-05-14T11:27:43+5:30
पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या देखील चांगली वाढली.
पुणे : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासत नव्याने 98 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली आहे. तर 7 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आज अखेर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 232 वर जाऊन पोहचली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 175 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी दिवसभरात 175 रूग्ण कोरोना मुक्त झाले.
पुणे जिल्ह्यात बुधवारी 864 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 98 रूग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर 834 संशयित रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत शहर, जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात एकूण रूग्ण तपासणीचे प्रमाण पाहिले असता रूग्ण वाढीचा वेग कमी झाल्याचे स्षष्ट होते. पंधरा दिवसापूर्वी 700 ते 800 रूग्णांची तपासणी केली असता शंभर पेक्षा अधिक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत होते. आता तपासणीचे प्रमाण 900 पुढे गेले असताना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभर पेक्षा कमी येत आहे. पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या देखील चांगली वाढली आहे. यामुळे आता पर्यंत 1533 रूग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यात आता अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 1524 ऐवढी राहीली आहे.
------
एकूण बाधित रूग्ण : 3232
पुणे शहर : 2810
पिंपरी चिंचवड : 177
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 285
मृत्यु : 175
घरी सोडलेले : 1533