Corona virus : अमेरिकेतून आला म्हणून सोसायटीत नाकारला जातोय प्रवेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 12:48 PM2020-04-09T12:48:14+5:302020-04-09T12:48:48+5:30

होम क्वारंटाईनही झाले कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत तरीही प्रवेशास नकार 

Corona virus : Admission to the Society is denied because it came from the United States | Corona virus : अमेरिकेतून आला म्हणून सोसायटीत नाकारला जातोय प्रवेश  

Corona virus : अमेरिकेतून आला म्हणून सोसायटीत नाकारला जातोय प्रवेश  

Next

नीलेश राऊत- 

पुणे : अमेरिकेहून १८ मार्चला पुण्यात आले़ कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या सुचनेनुसार होम क्वारंटाईन झाले. होम क्वारंटाईनाचा कालावधीत कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नसल्याचा निर्वाळा पालिकेच्या वैद्यकीय अधिकानी दिला. यामुळे ती व्यक्ती जवळच्याच सोसायटीत निवासास असलेल्या आईवडिलांकडे जाण्यास निघाली. परंतू, सदर सोसायटीने केवळ अमेरिकेतून आला असल्याचा ठपका ठेऊन, प्रथम कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्या़ तरच सोसायटीमध्ये प्रवेश देऊ असे सांगून संबंधितास प्रवेश नाकारला आहे. 
पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक़ल्पना बळीवंत रहात असलेल्या बोपोडी येथील एका इमारतीतच सदर अमेरिका रिटर्न व्यक्ती होम क्वारंटाईन होती. १८ मार्चला पुण्यात आल्यावर संबंधित व्यक्तीला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसतानाही, नियमानुसार होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या. त्यामुळे ती व्यक्ती स्वत:च्या घरी आई-वडिलांकडे न जाता जवळच असलेल्या बहिनीच्या घरी होम क्वारंटाईन झाली. होम क्वारंटाईन होण्यापूर्वी त्या घरातून त्यांनी बहिण व तिच्या पतीला आई-वडिलांकडे पाठविले. त्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर घेऊन सदर व्यक्ती १४ दिवस तेथे होम क्वारंटाईन झाली. या काळात पालिकेचे आरोग्य पथकही त्यांची तपासणी करून गेले़ तसेच नित्याने दूरध्वनीवरून संपर्कात होते़ परंतू त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. 
होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आणखी काही दिवस त्यांना आहे.   त्याच ठिकाणी राहण्याची सूचना पालिकेच्या स्थानिक अधिकाºयांनी दिली़ विशेष म्हणजे हाही कालावधी संपला आणि कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांनी आपल्या घराचा रस्ता धरला. परंतू, आई-वडिल राहत असलेल्या त्या सोसायटीत सोसायटी पदाधिकाºयांनी त्यांना येण्यास आजही मज्जाव केला आहे.  
१८ मार्चला पुण्यात आलेली व्यक्ती कोरोनामुक्त असताना सुध्दा केवळ ती अमेरिका रिटर्न आहे. म्हणून सदर सोसायटी त्यांना प्रवेश नाकारला आहे. जर सोसायटीत यायचे असेल तर कोरोना संसर्ग झाला नसल्याचा वैद्यकीय दाखला द्या असा आग्रह संबंधित सोसायटीने लावून घरला आहे. परिणामी महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़बळीवंत यांनी सदर व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे सोसायटीच्या पदाधिकाºयांना दूरध्वनी करून सांगितले. परंतू सोसायटीने तसे वैद्यकीय प्रमाणपत्र त्या व्यक्तीने सादर करावे तरच त्यांना सोसायटीत प्रवेश दिला जाईल असे सांगितले आहे़. 
याबाबत लोकमतशी बोलताना डॉ़बळीवंत यांनी, पुणे शहरात परदेशातून आलेल्या व केवळ कोरोना संबंधित लक्षणे असलेल्यांनाच आपण पालिकेच्या क्वारंटाईन कक्षात दाखल करीत असतो व इतरांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करीत असल्याचे सांगितले़. त्यानुसार या व्यक्तीने क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून, त्यांना कुठलीही लक्षणे नसल्याने सोसायटीने त्यांना प्रवेश दिला पाहिजे असे सांगितले़. क्वारंटाईनचे निकष पूर्ण केले असतील तर सोसायटीनेच त्यांचे परदेशातून आलेल्या प्रवासाचे तिकिट तपासून तसेच स्थानिक यंत्रणेकडून क्वारंटाईनची खातरजमा करून त्यांना प्रवेश दिला पाहिजे़. पुणे शहरात ४० ते ४५ हजार सोसायट्या आहेत, प्रत्येकाला असे पत्र देणे पालिकेला शक्य नसल्याने नागरिकांनी सहकार्य करावे़. केवळ कोरोनाच्या भितीमुळे  एखाद्या परदेशवारी केलेल्या व लक्षणे नसलेल्या व्यक्तीला संशयित म्हणून अशी वागणकू दिली गेली तर याबाबत पोलीसांकडे संबंधितांची तक्रार करावी लागेल. 
--------
होम क्वारंटाईन पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तरी द्यावे
परदेशातून आलेले परंतू कोरोनाची कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींना पालिकेकडून होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या जातात. या कालावधीत त्यांची नित्याने तपासणी होत असते. त्यामुळे होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला कोरोनाचा कुठलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले नसेल, तर तसे प्रमाणपत्र महापालिकेने दिल्यास सर्वांच्याच मनातील शंका दूर होतील. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता परदेशातून आलेल्या व कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना असे वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेने दिले पाहिजे अशी अपेक्षा परदेशवारी करून आलेल्या संबंधित व्यक्तीच्या बहिणीने व्यक्त केली आहे़. 
--------------------------

Web Title: Corona virus : Admission to the Society is denied because it came from the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.