Corona virus : पुण्यातील दुसर्या कोरोनाबाधित पोलीस कर्मचार्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:17 PM2020-05-21T14:17:05+5:302020-05-21T14:22:25+5:30
पुणे पोलीस दलातील २२ पोलीस कर्मचार्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचार्यांचा कोरोना विषाणुची लागण होऊन मृत्यु झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. यापूर्वी एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला आपले प्राणगमवावे लागले होते. पुणे पोलीस दलातील २२ पोलीस कर्मचार्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील किमान ११ जणांनी कोरोनावर मात करुन ते उपचारानंतर आता घरी गेले आहे. त्यातील काही जण आता पुन्हा कोरोना योद्धा म्हणून कामावर परत आले आहेत.
समर्थ वाहतूक पोलीस विभागाने कार्यरत असलेल्या व कटेंन्मेंट झोनमध्ये काम करीत असलेल्या या कर्मचार्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे दिसून लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ४२ वर्षाचे हे पोलीस कर्मचारी सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये रहात होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी व ३ मुले असा परिवार आहे. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस निरीक्षकासह ६ पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत १ हजार ३८८ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ४२८ पोलिसांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.तर बुधवारपर्यंत राज्यातील १२ पोलिसांचा मृत्यू झाला होता.