Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:02 PM2020-06-29T15:02:24+5:302020-06-29T15:19:13+5:30
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन या बैठकीला महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते...
पिंपरी: औद्योगिक नगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे रिपोर्ट सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच भोसरी मतदारसंघातील माजी विरोधी पक्षनेते असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या शहरात 2722 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
भोसरीचेआमदार असलेल्या महेश लांडगे यांच्याकडे शहर भाजपची धुरा आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचा बाहेर मोठ्या प्रमाणात वावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौऱ्यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती.
आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रावाच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे.
त्यांनी चार दिवसांपूर्वी महापालिकेतील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली होती. आयुक्तांच्या अॅन्टी चेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यामुळे किती जणांची तपासणी करावी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
............................................................
‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’ मुळे चिंता
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन येथे बैठक झाली होती. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते. तसेच, गेल्या आठवडाभर आमदार लांडगे यांनी मतदार संघामध्ये मोठ्याप्रमाणात वेळ घालवला आहे. आठवड्यातून एकवेळ महापालिकेत भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे माजी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांच्या संपर्कात आमदार लांडगे आले आहेत
ते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी दौऱ्यामध्ये ते सहभागी होते. यावेळी त्यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.