Corona virus : सावधान ! सोशल मीडियावर कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 05:43 PM2020-03-13T17:43:19+5:302020-03-13T17:59:32+5:30
सातारा व सांगली येथे कारवाई करण्यास सुरुवात
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाव्दारे चुकीच्या अफवा व माहिती पसरवली जात आहे. तसेच दुबईहून पुण्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी देखील काही दिवसांपूर्वी फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्याप्रमाणे सातारा व सांगली येथे कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यापुढील काळात ही कारवाई आणखी कडक पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते. म्हैसेकर म्हणाले, सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकलयाप्रकरणी दोन केसवर काम सुरू केले आहे. यात सातारा व सांगली येथे सोशल मीडियावर चुकीची माहिती व अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात सुरुवात झाली आहे.अशा लोकांना मोकळीक देणार नाही. लोकांनां फसवलं जाणं खपवून घेतलं जाणार नाही.
पुणे वगळता कोल्हापूर 44 , सातारा 9, सांगली 6, सोलापूर 7 इतके परदेशी जाऊन आलेले प्रवासी आहेत. त्यांना घरात विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी घरतल्यांशी कमीतकमी संपर्क ठेवावा. पुण्यातील 170 लोक जे महिन्याभरात भारताबाहेर गेले आणि आले. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, तपासणी केली जाईल. संशयित असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. तसेच 5 स्टार हॉटेलमध्ये आलेले विदेशी नागरिकही तपासणार आहे. सिनेमागृहबाबत लोकांनी एसी असलेल्या ठिकाणी जाऊ नये.यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुण्यातील दहापैकी नऊ केसेस या परदेशी भेट देणाऱ्या नागरिकांच्या आहेत. स्थानिक फक्त एक वाहन चालकाची आहे.भारतीय लोक किंवा जे भारतात आहेत त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. लोकांनी फार घाबरू नये. या ऋतूत खोकला, ताप येऊ शकतो. तो साधा असू शकतो. लोकांनी संभ्रम दूर करावा. पुण्यातील १७० लोक जे महिन्याभरात भारताबाहेर गेले आणि आले. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, तपासणी केली जाईल. संशयित असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ५ स्टार हॉटेलमध्ये आलेले विदेशी नागरिकही तपासणार. सिनेमागृह बाबत लोकांनी एसी असलेल्या ठिकाणी जाऊ नये.यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये.