Corona Virus : पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ८५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 11:28 AM2020-09-29T11:28:06+5:302020-09-29T11:28:28+5:30

रविवारपर्यंत शहरात १ लाख २१ हजार १७६ रुग्ण बरे झाले आहेत.

Corona Virus : Comfortable! The cure rate has reached 85 percent In Pune | Corona Virus : पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ८५ टक्क्यांवर

Corona Virus : पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ८५ टक्क्यांवर

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्यूदरही झाला कमी : सक्रिय रूग्णांचे प्रमाण साडेबारा टक्के 

पुणे : शहरातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कमी झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर गेले आहे. शहरातील मृत्युदर २.३ टक्के असून सक्रिय रूग्णांचे प्रमाण साडेबारा टक्के आहे. मागील आठवड्यात दिवसाकाठी होत असलेली दोन हजारांची वाढ कमी झाली असून ती १५०० ते १७०० च्या दरम्यान असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत शहरात एकूण १ लाख ४२ हजार १३६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, यातील १ लाख २१ हजार १७६ रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ८५ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यात असलेलीआ खाटांची कमतरता आता कमी झाली असून रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. रविवारी ऑक्सिजनच्या १८० खाटा आणि व्हेंटिलेटरच्या खाटा रिकाम्या असल्याचे डॅशबोर्डवर दिसत होते. रुग्ण वाढीचे हे प्रमाण असेच कमी झाल्यास आणखी दिलासा मिळेल.

 आजवर ३ हजार ३७३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण २.३ टक्के आहे. तर, सक्रिय रुग्ण १७ हजार ५८७ असून हे प्रमाण साडेबारा टक्के आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर मात्र २८ टक्क्यांच्या आसपास आहे. हा दर कमी झाल्यास आणखी दिलासा मिळू शकणार आहे. गेल्या काही दिवसात बधितांचे लवकर निदान होऊ लागल्यामुळे गंभीर रुग्णांचे (गॅसपिन) प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. एकीकडे खाटा वाढविण्यात येत असून जम्बो कोविड सेंटर आणि बाणेर कोविड सेंटरमुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. गृह विलगिकरणात असलेल्या रूग्णांची संख्या जवळपास आठ हजारांच्या आसपास आहे. 

Web Title: Corona Virus : Comfortable! The cure rate has reached 85 percent In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.