Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:02 AM2020-08-11T11:02:36+5:302020-08-11T11:10:52+5:30

सोमवारी शहरात १ हजार ४९९ कोरोनामुक्त; ७६१ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ

Corona Virus : Comfortable! Pune has twice as many coronary heart disease patients as new patients; | Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार १३३ नागरिकांची स्वाब तपासणी विविध रूग्णांलयात ७३८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू ४४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४१७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार आजपर्यंत शहरात ६६ हजार ७२७ जण कोरोनाबाधित; अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या ही १५ हजार ४३

पुणे : पुणे शहरात सोमवारी १ हजार ४९९ कोरोनाबधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, दिवसभरात ७६१ रुग्णांची वाढ झाली आहे़. तर आज ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून,यापैकी ११ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. 
  पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७३८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४१७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 
         आजपर्यंत शहरात एकूण ६६ हजार ७२७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १५ हजार ४३ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५० हजार ११३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ५७१ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        
        -----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार १३३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख २४ हजार ७२१ वर गेला आहे.

Web Title: Corona Virus : Comfortable! Pune has twice as many coronary heart disease patients as new patients;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.