Corona virus : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:04 PM2020-03-21T13:04:31+5:302020-03-21T13:04:54+5:30

मास्क वापरण्याचे फायदे दिले समजावून

Corona virus : consious movement against corona with vehicle Driver is start by Pune police | Corona virus : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन

Corona virus : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन

Next

पुणे : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पुण्यातला हा आकडा २२ वर पोहचला आहे. त्यामुळे सरकार व जिल्हा प्रशासन पातळीवर विविघ पावले उचलली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेने अनेक जाहिरातींद्वारे कोरोनाविषयी जनजागृती सुरु केली आहे. या  मोहिमेत पुणेपोलिसांकडून वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात पुढाकार घेण्यात येत आहे. नागरिकांचे प्रबोधन करत मास्क वापरण्याचा आग्रह धरत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
गरज असेल तरच बाहेर पडावे असे पुणे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरुण पिढीने या सुट्टीचा गैरफायदा घेत सुट्टीचा आनंद घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडणे गरजेचे आहे मात्र ठीक ठिकाणी तरुण मुले एकत्र येऊन गर्दी करून गप्पा मारत वेळ घालवत बसलेले दिसत आहेत. यामुळे तरुणाईचे या घातक कारोना व्हायरस कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे ही बाब नागरिकांना पोलीस देखील समजावून सांगत आहेत.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बोराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगावे, हेड कॉन्स्टेबल मुथय्या, अजय गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच औंध चौकी मधील पोलीस कर्मचारी उपस्थित होते औंध येथील मेडिपॉइंट हॉस्पिटल चौक येथे पोलिसांच्या वतीने मास्क न वापरणाºया नागरिकांचे प्रबोधन करून मास्क वापरण्याचे फायदे सांगण्यात येत होते. प्रशासनाने शाळा, कॉलेजेस तसेच विविध ठिकाणचे कार्यालय बंद ठेवून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे . 
चतु:र्श्रुंगी पोलिसांतर्फे वाहनधारकांना करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी प्रबोधन करताना दिसत आहे. पोलिसांतर्फे वाहने अडवून नागरिकांना या व्हायरसची माहिती देऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Corona virus : consious movement against corona with vehicle Driver is start by Pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.