Corona virus : आता पुणे शहरातील औषध विक्रेत्यांना द्यावी लागणार पोलिसांना ग्राहकांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 09:12 PM2020-04-18T21:12:46+5:302020-04-18T21:19:48+5:30

नागरिकांनी स्वत:च्या मनाने केलेले उपचार त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी धोक्याचे ठरु शकतात.

Corona virus : Consumer Information will be Provide to police by Drug Dealers | Corona virus : आता पुणे शहरातील औषध विक्रेत्यांना द्यावी लागणार पोलिसांना ग्राहकांची माहिती

Corona virus : आता पुणे शहरातील औषध विक्रेत्यांना द्यावी लागणार पोलिसांना ग्राहकांची माहिती

Next
ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनाचे पालन करणे औषध विक्रेत्यांना बंधनकारक असणार८९७५९५३१०० या व्हॉट्सअप नंबरवर ग्राहकांची नोंद ठेवलेली फोटो कॉपी पाठवावी लागणार

पुणे : शहरातील सर्व औषध विक्रेत्यांना आता दिवसभर येणाऱ्या सर्व ग्राहकांनी घेतलेल्या औषधाची माहिती पोलिसांनी दररोज रात्री ८ वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे. त्यासाठी पोलिसांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून त्याच्यावर बिनचुकपणे फोटो कॉपी पाठवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ़. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. 
शहरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. हे रुग्ण सुरुवातीला परस्पर मेडिकल दुकानात जाऊन सर्दी, खोकला किंवा ताप आला तर, नागरिक स्वत: औषधांच्या दुकानात जाऊन डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना औषधे खरेदी करुन सेवन करतात. मात्र, सध्याच्या कालावधीत कोरोनाच्या बाबतीत देखील हीच प्राथमिक लक्षणे आहेत. नागरिकांनी स्वत:च्या मनाने केलेले उपचार त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी धोक्याचे ठरु शकतात. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्ती शोधणे,  त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करणे व त्यातून कोरोना विषाणूच्या संसगार्ची साखळी तोडणे शक्य होणर आहे. शहरातील विविध औषधविक्री दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांत सर्दी,ताप, कोरडा खोकला, श्र्वसनाचा त्रास होणे या प्रकरची कोरोना विषाणू सदृश्य लक्षणे दिसून येत असल्यामुळे  त्याची माहिती प्रशासनाला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.
़़़़़़़़
अशी आहे नियमावली:
* सर्दी ताप, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास होणे यासाठी लागू पडणाºया औषधांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची नोंद त्यांचे नाव, पत्ता व फोन नंबरसह करावी लागणार आहे.
* सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना औषधांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची नोंद प्राधान्याने करणे बंधनकारक
* औषधे कोणासाठी घेतली जात आहेत. याची ग्राहकांकडे चौकशी करावी लागणार, त्या रुग्णांची नावासह नोंद ठेवावी.
* दररोज सांयकाळी आठ वाजता पुणे शहर पोलिस मुख्य नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांक ८९७५९५३१०० या नंबरवर ग्राहकांची नोंद ठेवलेली फोटो कॉपी पाठवावी लागणार आहे. माहिती पाठविताना औषध विक्रेत्याच्या दुकानाचे नाव व संपर्क क्रमांकाची नोंद करणे गरजेचे आहे.
* आजारी व्यक्तीला कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येत असल्यास त्याला मनपाने कार्यान्वित केलेल्या फ्लु क्लिनिकमध्ये वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी घेऊन जाण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच फ्ल्यु क्लिनिक शहरात कोठे कोठे सुरू आहेत याची यादी ग्राहकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावी लागणार आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करणार नाहीत याच बरोबर सामाजिक अंतराची दक्षता घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनाचे पालन करणे औषध विक्रेत्यांना बंधनकारक असणार आहे. 

़़़़़़़़़
अन्न व औषध प्रशासनाने याची माहिती आम्हाला अगोदर दिली होती़ त्यानुसार आमच्या दुकानात येणाऱ्या सर्व ग्राहकांचे नाव, त्यांनी घेतलेले औषध व त्याचा संपर्क क्रमांक अशी नोंद एक वही ठेवण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने शिळे अन्न खाल्याने त्रास होणे, जुलाब होणे, थंड पदार्थ खाल्याने त्रास होणारे आजारावर औषध घेण्यासाठी ग्राहक येतात़ सर्दी, खोकला, ताप असलेले रुग्ण खूप कमी असतात़ त्यामुळे अशा लोकांना आम्ही महापालिकेच्या फ्ल्यु क्लीनिकमध्ये जाण्यास सांगणार आहोत. 
चिन्मय मोडक, मंगल मेडिकल़

Web Title: Corona virus : Consumer Information will be Provide to police by Drug Dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.