Corona Virus : दहा दिवसांत २२०० बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतर करा : विभागीय आयुक्त सौरभ राव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 08:43 PM2020-09-22T20:43:36+5:302020-09-22T20:44:31+5:30

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात खासगी रुग्णालयांतील निम्मे बेड तरी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याच्या सूचना..

Corona Virus: Convert 2200 beds into oxygen beds in ten days: Divisional Commissioner Saurabh Rao | Corona Virus : दहा दिवसांत २२०० बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतर करा : विभागीय आयुक्त सौरभ राव

Corona Virus : दहा दिवसांत २२०० बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतर करा : विभागीय आयुक्त सौरभ राव

Next
ठळक मुद्देमहिनाअखेरपर्यंत २ हजार ६६ ऑक्सिजन बेड, २५० व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासेल असा अंदाज

पुणे : सध्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण बेड पैकी ८० टक्के बेड खाजगी हाॅस्पिटलमध्ये असून, केवळ २० टक्केच सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भाग मिळून संपूर्ण जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार २०० बेड असे आहेत, त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध करता येणे शक्य आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत यातील निम्मे बेड तरी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
मंगळवारी (दि.२२) झालेल्या पत्रकार परिषदेत राव बोलत होते. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात भेट देऊन कोरोनाचा आढावा घेतला. आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यादरम्यान खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यासंबंधी आदेश महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी काढणार आहेत.
राव म्हणाले, या महिनाअखेर पर्यंत ऑक्सिजन बेडचे २ हजार ६६ तर २५० व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे. त्याबाबत बेड वाढवण्यासाठी जम्बो रुग्णालय, ससून, डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय ऑक्सिजन विरहीत बेडची कमतरता भासणार नाही यासाठी शहरसह ग्रामीण भागात नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान, शासनाकडून जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ५३९ कोरोना पॉझिटीव्ह असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ही ६७ हजार ८९४ एवढी असण्याची शक्यता आहे. या अनुमानानुसार सध्या बेड उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.  
-----
कोरोना नियंत्रणासाठी व्यवस्थापन  आराखडा तयार केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये ३१९१ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे  गेल्या आठवडाभरात ५८८ ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात आली तसेच आयसीयू चे ३३१ उपलब्ध झाले. आठवडाभरात त्यामध्ये ८१ निवड झाली आहे. ससून रुग्णालयातील बेडची क्षमता ३०० ने वाढविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिली असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये ऑक्सीजन किंवा आयसीयू बेडची कमतरता नाही. रायगड आणि भरूच मधून ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने सद्यस्थितीत ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार रुग्णालयांकडून आलेली नसल्याचे असे आयुक्तांनी नमूद केले.
_

Web Title: Corona Virus: Convert 2200 beds into oxygen beds in ten days: Divisional Commissioner Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.