Corona virus : 'होम आयसोलेशन’ झालेल्यांमुळेच शहरात वाढताहेत कोरोनाबाधित? रुग्ण बिनधास्त, महापालिका यंत्रणा मात्र हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:30 PM2020-09-17T14:30:51+5:302020-09-17T14:40:26+5:30

होम आयसोलेशन’ झालेल्यांचा समाजजीवनातील सर्रास वावर ठरतोय सध्या डोकेदुखी..

Corona virus : Corona are growing in the city due to 'home isolation' people in pune ? | Corona virus : 'होम आयसोलेशन’ झालेल्यांमुळेच शहरात वाढताहेत कोरोनाबाधित? रुग्ण बिनधास्त, महापालिका यंत्रणा मात्र हतबल 

Corona virus : 'होम आयसोलेशन’ झालेल्यांमुळेच शहरात वाढताहेत कोरोनाबाधित? रुग्ण बिनधास्त, महापालिका यंत्रणा मात्र हतबल 

Next
ठळक मुद्देना हातावर शिक्का, ना घराच्या दारावर होम आयसोलेशेन झालेल्या व्यक्तींची नावे‘होम आयसोलेशन’ झालेल्या पण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा विचार 

पुणे : कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत पण पॉझिटिव्ह आहेत, असे शेकडो कोरोनाबाधित रूग्ण तपासणीअंती ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्विकारत आहेत. पण ‘होम आयसोलेशन’ झालेले हेच कोरोनाबाधित सध्या कोरोनाचा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच ‘होम आयसोलेशन’ झालेल्यांवर महापालिकेचे कुठलेच नियंत्रण किंबहुना नियंत्रण ठेवता येत नसल्याने, त्यांचा समाजजीवनातील सर्रास वावर हा सध्या डोकेदुखी ठरला आहे. 
    पुणे महापालिका हद्दीत आजमितीला साधारणत: सात हजार कोरोनाबाधित रूग्णांनी ‘होम आयसोलेशन’ होऊन घरीच औषधोपचार घेण्याचा पर्याय स्विकारला आहे. पण हा पर्याय स्विकारणारे रूग्ण दोन-तीन दिवस घरात राहतात व त्यानंतर…
..... 
ना हातावर शिक्का, ना घराच्या दारावर होम आयसोलेशेन झालेल्या व्यक्तींची नावे 
    एकीकडे महापालिका कोविड केअर सेंटर बंद करून, लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना १४ दिवस घरात राहून औषोधोपचार घेण्याचा पर्याय देत आहे़ हा पर्याय देताना पूर्वी महापालिकेकडून संबंधित रूग्णाच्या हातावर ‘होम आयसोलेशन’ शिक्का मारला जात असे़ या शिक्क्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला जी शाई दिली जाई ती महिनाभर तरी हातावरून पुसली जात नव्हती. पण आत्ता जी शाई पालिकेकडे उपलब्ध आहे, त्याव्दारे शिक्का मारला तर तर अवघ्या एका दिवसात ती पुसली जाते. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी वर्गानेही आता हातावर शिक्का मारणे बंद केले असून, केवळ संबंधित रूग्णाकडून ‘मी चौदा दिवस घरात राहील, बाहेर फिरणार नाही तथा पालिकेकडून फोनव्दारे देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार औषधोपचार घेऊन नित्याने प्रकृतीची खरी माहिती देईल’ अशा आशयाचे हमीपत्र लिहून घेतले जाते. 
    या हमीपत्रावर घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांचा जो पत्ता असतो तो गृहित धरण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. व त्या व्यक्तीची माहिती क्षेत्रिय कार्यालयांकडे त्याच्या फोन नंबरसह दिली जाते. पण सद्यस्थिताला त्या व्यक्तीच्या राहत्या घराच्या दारावर ‘होम आयसोलेशन’ झालेल्या व्यक्तींचे नाव, कालावधी याची संपूर्ण माहिती असलेले स्टिकर्सही की जे पूर्वी लावले जात होते ते आता लावले जात नाही. त्यामुळे सोसायटीत, वस्तीत किंवा परिसरातील इतरांना संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे हे कळतही नाही.परिणामी ना हातावर शिक्का, ना घराच्या दारावर होम आयसोलेशेनचे पोस्टर्स यामुळे संबंधित पॉझिटिव्ह व्यक्ती बिनधास्तपणे समाजात वावरत असून, त्यांच्यावर कोणाचेच निर्बंध उरलेले नाहीत.
----------------------------------
महापालिका यंत्रणाही हतबल 
     ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून घरी गेलेली व्यक्ती घरी गेल्यावर दोन-तीन दिवसानंतर सर्रास पणे घराबाहेर फिरू लागल्या आहेत़ ज्या कोरोनाबाधित व्यक्ती घरी उपचार घेत आहेत, ते वॉर्ड ऑफिसस्तरावरून गेलेले फोन उचलत नाहीत. जे संपर्क क्रमांक दिले आहेत ते चुकीचे आहेत़ तर अनेक जणांनी पाठपुरव्यासाठी यंत्रणेकडून जाणारा फोन क्रमांकच ब्लॉक करून ठेवला आहे. अशा तक्रारी प्रत्यक्ष फिल्डवर अथवा ‘होम आयसोलेशन’ झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना औषोधोपचारासाठी मार्गदर्शन करणाºया यंत्रणेने केल्या आहेत. 
    शहरात दररोज दीड ते दोन हजार कोरोनाबाधित रूग्ण वाढत असून, यापैकी ६० टक्क्यांहून अधिक रूग्ण ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्विकारत आहेत़ परंतु, हमीपत्र भरून देताना दिलेली माहिती अनेकदा खोटी असते तर पत्ताही एक व राहतात दुसरीकडे अशी परिस्थिती अनेक घटनांमध्ये दिसून आली आहे़ अशा परिस्थितीत महापालिका यंत्रणाही हतबल झाली आहे़ 
    --------------------
‘होम आयसोलेशन’ झालेल्या पण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा विचार 
    ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून १४ दिवस घरात राहणाऱ्या व्यक्ती घराबाहेर पडताना दिसत आहे.त्यामुळे वॉर्ड स्तरावर काम करणाऱ्या यंत्रणा ‘होम आयसोलेशन’ पर्याय स्विकारूनही जर संबंधित व्यक्ती घराबाहेर पडली तर तिच्यावर थेट पोलिस कारवाई करावी यासाठी मागणी केली आहे. याबाबत महापालिकेची आरोग्य यंत्रणेने पोलिस दलातील वरिष्ठांशी बोलून, प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत ‘होम आयसोलेशन’ झालेल्या व्यक्तींची यादी सूपूर्त करावी व घराबाहेर पडणाऱ्या कोरोनाबाधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी वॉर्डस्तरावरून होत आहे.
---------------------
स्वॅब दिल्यावर अनेकांकडून पोबारा 
    महापालिकेच्या विविध कोरोना चाचणी केंद्रांवर स्वॅब दिल्यावर, लक्षणे असलेल्या संबंधित व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये थांबावे असे यंत्रणेकडून सांगितले जाते. मात्र काही जण स्वॅब दिल्यावर त्या हॉस्पिटलमधून पळून जातात़ अशा घटनाही शहरात वारंवार घडत आहेत. 
    दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कॉन्टक्ट ट्रेसिंग प्रक्रियेतून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येते. परंतु यातील अनेक जण आपली चाचणी पॉझिटिव्ह येईल म्हणून पालिकेच्या सूचनेनुसार चाचणीसाठी जातच नाहीत. तसेच कित्येक जण स्वॅब दिल्यावर चाचणी अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन होण्याऐवजी बिनधास्तपणे सर्वत्र फिरत राहतात. 

Web Title: Corona virus : Corona are growing in the city due to 'home isolation' people in pune ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.