Corona virus : चिंताजनक ! पुण्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर ;  तर रुग्ण संख्या २०४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 01:15 PM2020-04-09T13:15:27+5:302020-04-09T13:16:30+5:30

पुणे शहरात गेल्या 12 तासांत 4 कोरोना बधितांचा मृत्यू

Corona virus : corona death number in pune 20 ; So the number of patients is 204! | Corona virus : चिंताजनक ! पुण्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर ;  तर रुग्ण संख्या २०४ वर

Corona virus : चिंताजनक ! पुण्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर ;  तर रुग्ण संख्या २०४ वर

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात १६८ , पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. पुणे शहरात गेल्या 12 तासांत 4 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. 
पुण्यातील कोरोनाबधितांच्या मृतांची संख्या गुरुवारी २० वर गेली असून, त्यातील एक जण बारामती येथील भाजी विक्रेता आहे. तर उर्वरित १९ कोरोना बधितांचा मृत्यू पुणे महापालिका हद्दीत झाला आहे. तसेच आज पुण्यातील एकूण कोरोनाबधितांच्या संख्येत दुपारी बारा वाजेपर्यंत २९ ने वाढ झाली असून हा आकडा आता २०४ वर गेला आहे. १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पालिका विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून विविध पावले उचलली जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना घराबाहेर न पडता सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात गेल्या तासांमध्ये कोरोनामुळे   मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या २०  पोहचली आहे. कालपर्यंत हा आकडा १६ होता, मात्र, यात गुरुवारी ४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील धोका निर्माण  झाला आहे. यामध्ये नायडू हॉस्पिटलमध्ये प्रथमच एका 44 वर्षीय कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला डायबेटीसचा ही आजार होता. इतर चार जणांमध्ये 2 रुग्ण हे ससून रुग्णालयातील आहेत. यापैकी एका रुग्णाचे वय 71 तर एक रुग्णाचे वय 54 आहे. नोबेल हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा मृत्यू कोरोना मुळे झाला असून, 67 वर्षीय हा रुग्ण डायबेटीसने ग्रस्त होता. गेल्या काही तासांत शहरात 4 जणांच्या कोरोनाबधितांच्या  मृत्यूमुळे पुण्यातील कोरोना बधितांच्या मृत्यूची संख्या एकूण २० झाली आहे.

Web Title: Corona virus : corona death number in pune 20 ; So the number of patients is 204!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.