Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:48 AM2020-05-05T00:48:32+5:302020-05-05T00:51:06+5:30

शहराच्या मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात हे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणुकीस होते. या पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण..

Corona virus : Corona infected assistant police sub-inspector death in pune | Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण

Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण

Next
ठळक मुद्देमधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास

पुणे : शहर पोलीस दलातील कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा सोमवारी दुपारी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कर्तव्य बजावत असताना पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, 
शहराच्या मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात ५७ वर्षांचे हे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणुकीस होते. या पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वप्रथम कोरोना बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांने कोरोनावर मात केली असून दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच लागण झालेल्या ७ जणांवर उपचार सुरु आहेत.
या पोलीस कर्मचाऱ्याला त्रास सुरु झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, व्हॅटिलेटर नसल्याचे कारण देत या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर आणखी एका रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ३ ते ४ तास हे कुटुंब उपचारासाठी मदत मागत होते. ही बाब एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी २४ एप्रिल रोजी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला.

Web Title: Corona virus : Corona infected assistant police sub-inspector death in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.