Corona virus : बारामतीत 'त्या' रुग्णाच्या कुटुंबात मुलगा आणि सुनेपाठोपाठ दोन नातवंडे कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:11 PM2020-04-08T16:11:46+5:302020-04-08T16:13:34+5:30
एकाच कुटुंबात पाच जणांना कोरोना संसर्ग
बारामती : बारामती शहरातील आढळलेल्या दुसऱ्या कोविड-१९ संक्रमित रुग्णाच्याकुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नातवंडे कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णाच्या संपर्कातील १2 जणांना तपासणीसाठी नायडु रुग्णालयात
हलविण्यात आले होते. त्यामध्ये चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी(दि ६) समर्थ नगरमध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये बारा व्यक्तीची तपासणी करण्यात आली .त्यामध्ये रुग्णाची सून व मुलगा या दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी दिसून आले आहे.त्यापाठोपाठ त्या रुग्णाच्या 1 आणि 8 वर्षाच्या नातीला संसर्ग झाला आहे .त्यामुळे एकाच कुटुंबात पाच जणांना कोरोना संसर्ग झाला असून शहरात एकूण सहा जण कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बारामतीकर धस्तावले आहेत.
दरम्यान,शहरातील श्रीरामनगर परिसरात २९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला आहे.तो रिक्षाचालक असुन त्याच्यावर नायडु रुग्णालयात उपचार सुरु आहे.त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सोमवारी सापडलेल्या दुसऱ्यावर रुग्णावर नायडु रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
———————————