Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे; मंगळवारी १ हजार २१३ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:24 PM2020-07-28T22:24:26+5:302020-07-28T22:26:18+5:30
शहरात आज तब्बल ४४ जणांचा मृत्यू
पुणे : पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात १ हजार २१३ कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली असून, पुणे शहराने आज ५० हजार रूग्णांचा टप्पा पार केला आहे. आजपर्यंत शहरात ५० हजार २३० रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३० हजार ८० जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर सद्यस्थितीला अॅक्टिव रूग्ण संख्या ही १९ हजार १३५ इतकी आहे.
दरम्यान आज दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू असून, या आठवड्यातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यू झालेल्या ४४ रूग्णांपैकी ११ रूग्ण हे शहराबाहेरील होते.शहरात आजपर्यंत १ हजार २१५ रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ७४२ रुग्ण अत्यवस्थ असून, ९८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत एकूण ५० हजार २३० रूग्ण आढळून आले आहेत.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ६ हजार ५६७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ लाख ५५ हजार ८१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
--------