Corona virus : पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर ‘कोवीड केअर सेंटर’मध्ये होणार उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:44 PM2020-05-02T18:44:35+5:302020-05-02T18:45:27+5:30
केवळ गंभीर रूग्णांना पाठविणार पुण्यात
पुणे : जिल्ह्यात कोरोना संशयितला तपासणीसाठी पुण्यात आणण्यात येत होते. येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, यापुढे जिल्ह्यातच अशा रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत १६ कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉझिटीव्ह असलेल्या गंभीर रूग्णालाच पुण्यातील रूग्णालयांमध्ये दाखल केले जाणार असूण अन्य रूग्णांवर या 'कोवीड' रूग्णालयातच उपचार केले जाणार आहे.
कोरोना रुग्णाचे स्क्रीनिंग तसेच उपचार आणि अन्य प्रकारच्या तपासण्या या पुण्यातील विशिष्ट हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. या ठिकाणी सर्व प्रकारचे रुग्ण एकत्रित येत असल्याने अनेकदा एकमेकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ग्रामीण भागातील ग्रीन झोन मधील रुग्ण उपचारासाठी अनेकदा रेड झोन मधील रुग्णांना बरोबर तपासण्या आणि उपचार घेतात. त्यातून देखील संसर्ग वाढू शकतो. यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात स्वतंत्रपणे १६ ठिकाणी कोविड केअर सेंटर्स उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
ग्रामीण भागातील ज्या रुग्णांना ताप, खोकला सर्दी लक्षणे आढळतील त्यांची तपासणी या केअर सेंटरमध्ये केली जाणार आहे. कोरोना विषयक सर्व तपासण्यासंह त्यांचया घशातील स्बॅबही तपासणीसाठी या सेंटरमध्ये घेतले जाणार आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह असतील त्यांना लक्षणे दिसत नसतील अशा रूग्णांना या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जाणार आहे. यातीळ एखादा रूग्ण गं भीर झाल्यास त्याला पुण्यातील रूग्णालयात हलवीले जाणार आहे.
........................
* जिल्ह्यातील बाधितांना मिळणार त्वरीत उपचार
जिल्हा परिषदेने नुकतेच १८८ समुदाय आरोग्य अधिकारी यांची भरती केलेली आहे. त्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. ही कोवीड केअर सेंटर २४ तास सात दिवस सुरू असतील. या केअर सेंटरमुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांना तातडीणे उपचार मिळण्यास सोईचे ठरणार आहे.
--------------