Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार; दिवसभरात १७६४ रुग्ण नवीन वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:21 PM2020-09-03T21:21:56+5:302020-09-03T21:22:27+5:30
आजारातून बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 85 इतकी झाली.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून गुरुवारी दिवसभरात १७६४ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १ लाख ४५९ झाला असून बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ८५ आहे.
गुरुवारी दिवसभरात ११८८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८८५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ९७३ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३५५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार १७० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात २६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २२ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ४०१ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार १८८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८२ हजार ८५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ९७३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ७० हजार ७५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.