Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ असताना आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:57 PM2020-08-20T13:57:23+5:302020-08-20T14:08:38+5:30

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट

Corona virus : Corona virus victims not getting treatment in Pune district | Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ असताना आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर

Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ असताना आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद सर्वसाधारण सभा वादळी पदाधिकारी अधिकाऱ्यांना धरले धारेवररखमाबाई राऊत योजना, व्हेंटिलेटर, स्वाब नमुन्यातील तफावत, उपचारास विलंब

पुणे :  जिल्ह्यात कोरोना बधितांना तातडीने उपचार देण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले, मात्र येथील रुग्णांना उपचार मिळत नाहीत. जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना बेड आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दोन दिवस बेड मिळत नाही तर सामान्य नागरिकांची अस्वस्थ काय असेल? खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील संशयितांचे स्वाब बीजे मेडिकलमध्ये पाठवण्यात येतात, मात्र त्याच्या अहवालात मोठी तफावत आहे. शासन जाणून बुजून कोरोनाबधितांची संख्या लपवत आहे का? गरिबांसाठी लाभदायक असलेली रखमाबाई राऊत आरोग्य यंत्रणा का बंद केली? आशा अनेक मुद्यांवरून जिल्ह्या परिषद सदस्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.  

   कोरोनामुळे 23 जुलै रोजी होणारी जिल्ह्या परिषदेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली होती. ही तहकूब सभा बुधवारी सामाजिक अंतर राखून जिल्हा परिषदेच्या मोठ्या सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाज कल्याण अधिकारी सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे तसेच सर्व विभाग प्रमुख आणि सदस्य यावेळी उपस्तीत होते. 

 जिल्यातील कोरोना बधितांना सवलतीच्या दरात आणि चांगले उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने रखमाबाई राऊत आरोग्य योजना सुरू केली. मात्र, एका महिन्यात ही योजना निधी नसल्याचे कारण देत बंद पाडली. सर्वसाधारण सभेची मंजुरी नसताना ही योजना बंद कशी केली असा प्रश्न उपस्तीत करत भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित केला. महात्मा फ़ुले योजने जन आरोग्य अंतर्गत येणारी जिल्ह्यात रुग्णालये कमी आहेत. यामुळे अनेकांना याचा लाभ मिळत नाही. अनेक रुग्णालये बिलांमध्ये हेराफेरी करत आहेत. अशा रुग्णालयांवर वचक ठेवणारी कुठलीही यंत्रणा जिल्ह्यात नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट होत आहे. जिल्हा रुग्णालयांची स्थिती ही भयंकर आहे. अनेक रुग्णायात ऑक्सिजन ची सुविधा नाही. व्हेंटिलेटर नाहीत. व्हेंटिलेटर नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. मात्र ते चालवणारे तंत्रज्ञ नाहीत. परिणामी ते असूनही त्यांचा उपयोग होत नाही, अश्या अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट होत आहे. याची दखल घेण्याची आग्रही भूमिका सदस्यांनी मांडली. 

 खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील रुग्णांचे स्वब पूर्वी एनआयव्ही ला पाठवले जात होते. मात्र, ते थांबून बीजे मेडिकल मध्ये पाठवण्यात आले. मात्र, तपासणी अहवालात मोठी तफावत आहे. 100 नामुन्यांपैकी 10 ते 15 अहवाल पोसिटीव्ह येत आहे. त्याच दिवशी रुग्णांनी दुसऱ्या प्रयोगशाळेत तपासण्या केल्या त्यात तफावत आली. शासन मुद्दामून रुगण्याची संख्या लपवत आहे असा आरोप सदस्यांनी केला. पदाधिकाऱ्यांची मोठया नेत्यांसोबत बैठका होतात मात्र, हे प्रश्न प्रभावी पणे मांडले जात नसल्याने समस्या वाढत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. 

यावर उत्तर देताना, अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष शिवतरे म्हणाले, यासंदर्भात आम्ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. रखमाबाई योजनेसाठी आम्ही 10 कोटींची मागणी केली. यावर ते म्हणाले राज्य शासनाची महात्मा फुले आरोग्य योजना असून दोन समांतर योजना चालवता येणार नाही. याच योजने अंतर्गत आम्ही काही फेरफार करू असे टोपे म्हणाले. यावर आम्ही रखमाबाई योजनेला मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव दिला आहे. सीएसआर निधीतून 50 व्हेंटिलेटर जिल्ह्याला मिळाले आहे.  येत्या काही दिवसांत आणखी 100 व्हेंटिलेटर जिल्ह्याला मिळणार आहे असेही शिवतरे म्हणाले. 
..... 
जिल्ह्यातील स्वब नमुने आता एनायव्ही तपासणार
बीजे मेडिकल मध्ये जिल्यातील रुग्णांचे स्वाब पाठवले जातात, मात्र त्यांच्या अहवालात मोठी तफावत असते. यामुळे रुग्णाची परिस्तिथी गंभीर होते आणि त्याला योग्य उपचार मिळत नाही. यामुळे इतर नागरिकही धोक्यात येतात. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद म्हणाले, जिल्ह्यांतील रुग्णांचे स्वाब पूर्वी एनआयव्ही मध्ये पाठवले जात होते. मात्र, एका तापसणीसाठी चार ते साडे चार हजार रुपये खर्च येत होता. यामुळे आम्ही बीजे मेडिकल ला स्वाब तपासणीला देत होतो. मात्र येथील तपासणी योग्य होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन यापुढे स्वाब नमुने हे एनआयव्ही मध्ये तपासले जातील. 
..... 
जिल्ह्यात 50 हजार अँटिजेन किट
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी दोन कोटींचे 50 हजार अँटिजेनट किट खरेदी करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यांतील रुग्णांची संख्या बघता त्या प्रमाणानुसार त्याचे वाटप तालुक्यांना केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

Web Title: Corona virus : Corona virus victims not getting treatment in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.