Corona virus : खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; १९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:15 PM2020-07-22T15:15:13+5:302020-07-22T15:18:16+5:30
राजगुरुनगर शहरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुणांची संख्या वाढत आहे.
राजगुरूनगर: खेड पोलीस ठाण्यातील एकोणीस पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस ठाण्याला दिलासा मिळाला आहे. मात्र प्रांतधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे..
राजगुरुनगर शहरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुणांची संख्या वाढत आहे. शहरातील ५ डॉक्टरांना यापूर्वी करणाची लागण झाली होती. तसेच खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांनाही ही करोनानी ग्रासले होते. संपर्कातील आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी करुणा चाचणी करून घेतली होती यामध्ये जवळून संपर्क आलेल्या पोलिस कर्मचार्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस ठाण्याला दिलासा मिळाला आहे. खेड पोलिस ठाण्यातील ठाण्याची इमारत आतून बाहेरून व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे. त्यातच प्रांताधिकारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे प्रांताधिकारी यांनी लॉकडाऊन दरम्यान तसेच गेल्या चार महिन्यापासून आरोग्य विभाग महसूल विभाग पोलीस प्रशासन यांच्या बैठका घेऊन कोरोनाचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.तालुक्यात तालुक्यातील आळंदी राजगुरुनगर या नगर परिषदे हद्दीत कशाप्रकारे उपाययोजना सुरू आहेत. कुठे काय कमी याबाबत प्रशासनाकडून वारंवार माहिती घेत होते. तसेच चाकण हद्दीतील म्हाळूंगे येथील म्हाडाच्या इमारती मध्ये येथे सुरू केलेल्या येथील केविड सेंटरलाही भेट देत होते. मात्र त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता यांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने महसुल यत्रंणेत खळबळ उडाली तर प्रांत कार्यालयात कामानिमित्ताने येणारे नागरीकही मोठ्या प्रमाणात येत असल्याने सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन प्रांतधिकारी यांनी केले आहे.