Corona virus : ससून रुग्णालयातील कोविड चाचणी क्षमता नऊ पटीने वाढणार : एस. चोकलिंगम 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:21 PM2020-06-20T14:21:14+5:302020-06-20T14:25:37+5:30

सध्या दररोज केवळ १५० चाचण्या, पुढील महिनाभरात ही क्षमता १३०० पर्यंत वाढणार...

Corona virus : Covid testing capacity at Sassoon Hospital to be increasing by 9 percent: S. Chokalingam | Corona virus : ससून रुग्णालयातील कोविड चाचणी क्षमता नऊ पटीने वाढणार : एस. चोकलिंगम 

Corona virus : ससून रुग्णालयातील कोविड चाचणी क्षमता नऊ पटीने वाढणार : एस. चोकलिंगम 

Next
ठळक मुद्देससूनमधील प्रयोगशाळा होणार अद्ययावतव्हेंटिलेटरसह विविध वैद्यकीय उपकरणांसाठी १३ कोटी

राजानंद मोरे
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ससून रुग्णालयातील कोविड चाचणी प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रयोगशाळेतील चाचणीची क्षमता जवळपास नऊ पटीने वाढविली जाणार आहे. सध्या दररोज केवळ १५० चाचण्या होत आहेत. पुढील महिनाभरात ही क्षमता १३०० पर्यंत वाढणार असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रशासकीय समन्वयक व जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांनी ‘लोकमत’ला दिली.

ससून रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये दि. २१ मार्च पासून कोविड चाचणीला सुरूवात झाली. या प्रयोगशाळेची दैनंदिन चाचणी क्षमता सध्या केवळ १५० एवढी आहे. वाढती रुग्णसंख्या तसेच चाचण्या वाढविण्याबाबत चर्चा सुरू असल्याने प्रयोगशाळांची क्षणता वाढविली जात आहे. त्याअनुषंगाने या प्रयोगशाळेची क्षमता वाढविली जाणार आहे. ह्यप्रयोगशाळेमध्ये १५० कोविड चाचण्या होत आहेत. ही क्षमता १३०० पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने चाचणीची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पुढील महिनाभरात हे काम पुर्ण होईल. चाचणीचा वेग वाढविण्याबाबतही चर्चा झाली आहे. बाहेरून येणारे नमुने आणि प्रयोगशाळेतील कामाच्या वेळांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ड्युटीमध्ये बदल करण्याचा विचार आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी चाचणीचे काम सुरू राहील. परिणामी, रोजच्या रोज अहवाल मिळू शकतील, असे चोकलिंगम यांनी सांगितले. तसेच कोविड रुग्णालयाची क्षमता, मनुष्यबळ, आवश्यक वैद्यकीय उपकरण खरेदीबाबतही त्यांनी 'लोकमत'ला माहिती दिली.


-----------------
नवीन ८० आयसीयु बेड
अकरा मजली इमारतीची क्षमता वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मदतीने उपलब्ध निधी, झालेले काम व करावयाचे काम याची पाहणी करण्यात आली. त्यांनी उपलब्ध निधीतच काम पुर्ण करता येईल, असे सांगितले आहे. २०१६ मध्ये १०९ कोटी मंजुर केले होते. त्यातील सुमारे ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित रक्कमेशिवाय आणखी ५ ते ८ कोटी रुपये लागणार होते. पण या अभ्यासामुळे ५ ते ८ कोटी रुपयांनी खर्च कमी झाला आहे. तसेच या रकमेसाठी पुन्हा प्रस्ताव करणे, त्याला मंजुरी यासाठी लागणारा वेळही वाचला आहे. पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन यंत्रणा तसेच अन्य काही साधने परदेशातून येणार असल्याने त्यासाठी विलंब होत आहे.
-----------
मनुष्यबळ वाढविणार
कोविड रुग्णालयामध्ये परिचारिका व वर्ग चारचे कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्याअनुषंगाने १११ वर्ग चार व १०४ परिचारिकांची पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी अनेक जण काही दिवसांपासून काम करत आहेत. नवीन इमारतीमध्ये वाढ केल्यानंतर मनुष्यबळ लागणार आहे. प्रामुख्याने अतिदक्षता विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक आहेत. तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी असे एकुण २३५ जणांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये निधी अपेक्षित आहे.
----------------------
वैद्यकीय उपकरणांसाठी १३ कोटी
कोविड रुग्णालयाची क्षमता वाढणार असल्याने व्हेंटिलेटरसह विविध वैद्यकीय उपकरणांची गरज भासणार आहे. त्यासाठी १३ कोटी रुपये किंमतीच्या उपकरणांचा प्रस्ताव करण्यात आला आहे. रुग्णालयाला आतापर्यंत ६ व्हेंटिलेटर देणगीतून मिळाले आहेत. तसेच पीपीई कीट, मास्क व इतर साधनेही देणगीतून मिळत आहेत.
---------------
कोविड रुग्णालय क्षमता
नवीन आयसोलेशन बेड - १००
सध्या - १४७ (४७ संशयित रुग्णांसाठी)
नवीन आयसीयु बेड - ८० (पहिल्या टप्प्यात ५०)
सध्या - ४०
सध्या व्हेंटिलेटर - २८
--------------

Web Title: Corona virus : Covid testing capacity at Sassoon Hospital to be increasing by 9 percent: S. Chokalingam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.