Corona virus : व्हेंटिलेटर वाढले तरी ‘वेटिंग’ कायम, ५०० रुग्ण आयसीयुमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:14 AM2020-07-24T11:14:16+5:302020-07-24T11:19:22+5:30
प्रशासन पुरेशा आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे.
पुणे : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार मागील दहा दिवसांत जवळपास ९० व्हेंटिलेटर उपलब्धही झाले. पण गुरूवारी दुपारी एकही व्हेंटिलेटर रिकामा नव्हता. व्हेंटिलेटरची संख्या वाढूनही रुग्णांना वेटिंगवरच राहावे लागत आहे. व्हेंटिलेटर नसलेल्या आयसीयु बेडमध्येही ७३ ने वाढ झाली असली तरी केवळ १२ बेड रिकाम्या होत्या. त्यामुळे प्रशासन पुरेशा आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच वेगाने वाढ होऊ लागली आहे. काही दिवसांपासून दैनंदिन आकडा दीड हजाराच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात बेड मिळणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने दि. १४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या कालावधीत आयसीयु, आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीच स्पष्ट केले होते. त्यानुसार मागील दहा दिवसांत यामध्ये वाढही झाली. पण प्रत्यक्षात वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत नव्याने वाढलेल्या बेड कमी पडू लागले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार, लॉकडाऊन लागु होण्याच्या आदल्या दिवशी (दि. १३ जुलै) डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) मध्ये एकुण ३००५ बेड उपलब्ध होत्या. त्यामध्ये आॅक्सिजनसहित १६३५, व्हेंटिलेटररहित आयसीयु १४० आणि २१० व्हेंटिलेटरसहित बेड होत्या. यापैकी अनुक्रमे २००, २ व ३ बेड रिकाम्या होत्या. या स्थितीमध्ये मागील दहा दिवसांत फारसा फरक पडलेला दिसत नाही. आॅक्सिजन व आयसीयुची संख्या वाढली असली तरी रुग्णही त्याचप्रमाणात वाढल्याने अपेक्षित बेड रिकाम्या राहत नाहीत. दि. २३ जुलै रोजी दुपारपर्यंत शहरात विविध रुग्णालयांमध्ये एकुण ५१४ आयसीयु बेड होत्या. त्यामध्ये ३०१ व्हेंटिलेटर बेडचा समावेश होता. या सर्व बेड फुल्ल झाल्याचे दिसून आले. अन्य आयसीयु बेडही केवळ १२ रिकामे होते. दहा दिवसांमध्ये एकुण आयसीयु बेडमध्ये १६४ ने तर व्हेंटिलेटरमध्ये ९१ ने वाढ झाली असली ते अपुरे पडू लागले आहेत.
-------------------------
शहरातील रुग्णालयातील आॅक्सिजन व आयसीयु बेडची स्थिती
(स्त्रोत - विभागीय आयुक्त कार्यालय डॅशबोर्ड)
दि. २३ जुलै दि. १३जुलै
एकुण उपलब्ध ए. उ.
आॅक्सिजनरहित १२०२ ३९८ १०२० १७०
आॅक्सिजनसहित २०२८ १८९ १६३५ २००
व्हेंटिलेटररहित आयसीयु २१३ १२ १४० २
व्हेंटिलेटरसहित आयसीयु ३०१ ०० २१० ३
------------------------------------------------------
गंभीर रुग्णांमध्ये वाढ (स्त्रोत - आरोग्य विभाग, महापालिका)
दिवस गंभीर रुग्ण
१ जुलै ३४७
१३ जुलै ४८६
१५ जुलै ५०२
१९ जुलै ५५७
२२ जुलै ६०९
---------------------
शहरातील काही मोठ्या रुग्णालयांतील गुरूवारी दुपारपर्यंत बेडची स्थिती (कंसात उपलब्ध)
रुग्णालय आॅक्सिजन आयसीयु (व्हेंटि.रहित) व्हेंटिलेटर
ससून १८१ (१३) ०० ६७ (०)
भारती १२० (०) १७ (०) १३ (०)
दीनानाथ २८० (०) १० (०) ३० (०)
सिम्बायोसिस ६० (३७) १९ (०) ११ (०)
बुधराणी ७४ (३) १६ (३) १७ (०)
केईएम। १०९ (५) ०० ११ (०)
नोबल ।। १७० (१) १० (०) १४ (०)
पुना। ७५ (१५) ४ (०) ११ (०)
रुबी। ८० (५) २० (०) २० (०)
----------------------------