Corona virus : राजगुरूनगर शहरात पाच खासगी डॉक्टर कोरोना 'पॉझिटिव्ह', पोलीस ठाण्यातही शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:25 PM2020-07-18T20:25:14+5:302020-07-18T20:29:42+5:30
तालुक्यात रोज सरासरी ५० नव्या रुग्णांची भर
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक रोखायला सर्व शासकीय यंत्रणा कमी पडु लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.लॉक डाऊन सुरू असताना तालुक्यात रोज सरासरी ५० नव्या रुग्णांची भर पडत आहे.तालुक्यात आत्तापर्यंत ६६० रुग्ण संख्या झाली आहे. शनिवारी(दि १८) तालुक्यात ४६ नवे रुग्ण आढळुन आले.त्यात चाकण १७,राजगुरूनगर ५ आणि आळंदी २ या शहरांसह ग्रामीण भागातील भोसे ६,गाडकवाडी ४, शिरोली ३,केळगाव व शेलपिंपळगाव २, राक्षेवाडी, चांडोली, कडाचीवाडी, निमगाव, धामणे प्रत्येकी १ अशा रुग्णांचा समावेश आहे.यामुळे तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ६६० झाली असुन त्यातील ३३७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३ जणांचा बळी जाऊन सध्या २६४ जण उपचार घेत आहेत. त्यात आजच्या ४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.त्याचप्रमाणे खेड पोलीस ठाण्यात सुद्धा एक अधिकारी पॉझिटिव्ह आढळुन आल्याने पोलीस व ठाण्यात गुन्हा, तक्रार दाखल करण्यासाठी नजीकच्या काळात आलेल्या तालुक्यातील नागरिकांचे धाबे दणाणले आहे.
राजगुरूनगर शहरात पाच डॉक्टर आणि पोलीस ठाण्यात एक अधिकारी पॉझिटिव्ह झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.खासगी दवाखाना, रुग्णालय चालविणारे डॉक्टर असल्याने गेल्या काही दिवसात त्यांच्याशी संपर्कात आलेले नागरिक धास्तावले आहेत. .