Corona virus : पूर्व हवेलीत चार कामगार व एक महिला कोरोनाबाधित; हडपसर येथील नामांकित कंपनीत कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:30 PM2020-05-27T12:30:07+5:302020-05-27T12:31:06+5:30

सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाबाधित रुग्ण

Corona virus : Four workers and a womfn corona affected in the east haveli; Worked in a famous company in Hadapsar | Corona virus : पूर्व हवेलीत चार कामगार व एक महिला कोरोनाबाधित; हडपसर येथील नामांकित कंपनीत कामाला

Corona virus : पूर्व हवेलीत चार कामगार व एक महिला कोरोनाबाधित; हडपसर येथील नामांकित कंपनीत कामाला

googlenewsNext
ठळक मुद्देकदमवाकवस्ती येथील एक व मांजरीत चार असे एकूण पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न

पुणे(कदमवाकवस्ती ) : पूर्व हवेलीतील कवडीमाळवाडी(कदमवाकवस्ती) येथील एक व मांजरी येथील चार असे एकूण पाचजण कोरोना बाधित असल्याचे मंगळवारी(दि.२६) रात्री उशिरा निष्पन्न झाले.यातील चार जण हे हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमध्ये कामगार आहेत तर एक कामगाराची पत्नी आहे, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.डी.जे.जाधव यांनी दिली.
     मागील गुरुवारपासून सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मंगळवारीही कायम राहिले आहे. यामुळे पुणे शहराप्रमाणेच पूर्व हवेलीत कोरोनाने हातपाय पसरल्याचे आढळून आले आहे.
     हडपसर परिसरातील वरील नामांकित काम करणारे मात्र पूर्व हवेलीत राहणारे सात कामगार व एका कामगाराचा सहा वर्षीय मुलगा व एका कामगाराची पत्नी असे नऊ जण मागील पाच दिवसाच्या कालावधीत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. हडपसर परिसरातील वरील कंपनीशी निगडीत असणारे मांजरी बुद्रुक, आळंदी म्हातोबाची व कदमवाकवस्ती हद्दीतील तब्बल नऊ जण कोरोनाबाधित सापडल्याने, पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. 
    हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील काही कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने गुरुवारपासून (दि. २१) कामगारांच्या कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यात रविवारी (दि.४) आळंदी म्हातोबाची येथील एक तर मांजरी बुद्रुक हद्दीतील एक असे दोन कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. तर मागील दोन दिवसात कदमवाकवस्ती व मांजरी बुद्रुक हद्दीतील चार कामगार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण एकाचवेळी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
      याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील काम करणारे चार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी रात्री उशीरा निष्पन्न झाले आहे. वरील चारही कामगारांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व घरातील सदस्य अशा सर्वांची कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. मागील पाच दिवसात तब्बल नऊ जण कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांनी आपआपली काळजी घ्यावी.

Web Title: Corona virus : Four workers and a womfn corona affected in the east haveli; Worked in a famous company in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.