Corona virus : शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलला यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही: आयुष प्रसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 02:33 PM2020-09-15T14:33:15+5:302020-09-15T14:39:36+5:30

कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा धोरण बदलले...

Corona virus: Government and private hospitals in Pune will no longer be short of oxygen: Ayush Prasad | Corona virus : शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलला यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही: आयुष प्रसाद 

Corona virus : शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलला यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही: आयुष प्रसाद 

Next
ठळक मुद्दे९५ टक्के ऑक्सिजनचा वैद्यकीय सेवेसाठी वापर

बारामती : पुणे जिल्ह्यात १९० मेट्रिक टन ऑक्सिजन २८० हॉस्पिटल मधील कोविड रुग्णांसाठी वापरला जात आहे.एकुण उत्पादीत ऑक्सिजनपैकी पूर्वी वैद्यकीयसाठी ३० टक्के, इंडस्ट्रीयल साठी ७० टक्के गॅस वापरला जात होता .मात्र ,सध्या कोविड मुळे हे धोरण बदलण्यात आले आहे. ९५ टक्के गॅस हा वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात आहे.उर्वरीत ५ टक्के ऑक्सिजन औषध निर्मिती व पुरक व्यवसायासाठी वापरला जात आहे. शहरातील सरकारी व खाजगी हॉस्पिटलला ऑक्सिजन कमी पडणार नाही,असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

बारामती शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला सोमवारी(दि १४) आयुष प्रसाद यांनी भेट दिली. येथील रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी सहा हजार लिक्विड गॅसचा साठा केला जाणाऱ्या टाकी बसवली आहे. त्याची देखील प्रसाद यांनी पाहणी केली.यावेळी प्रसाद यांनी कोविड रुग्णांना वाढती ऑक्सिजनची मागणी पाहता पुरवठा धोरण बदलल्याची दिलासा देणारी माहिती दिली.यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रसाद म्हणाले,रुग्णांना ऑक्सिजन अभावी उपचारास अडचण येणार नाही. तसेच ऑक्सिजनच्या दरात वाढ केल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर प्रशासन कडक कारवाई करणार आहे. सध्या जिल्ह्यात २८० सेंटर सुरू आहेत.तसेच व्हेंटिलेटर बेड तयार केले जात आहेत.५५० खाजगी डॉक्टरांची सेवा आदिग्रहन करण्यात आली आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या १०० गावांत ५० कुटुंबाच्या मागे एक पथक अशी मोहीम राबवली जाणार आहे. तर बारामती शहरात बुधवार, गुरुवार, शुक्रवार पासून मोहीम राबवली जाणार आहे. हा गॅस येथील हॉस्पिटलला पाच दिवस पुरणार असल्याचे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

बारामती तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यासाठी अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी सिल्व्हर जुबली हॉस्पिटलमध्ये सहा हजार लिटर लिक्विड गॅसची टाकी बसवण्यात आली आहे. जिल्ह्यातील हॉस्टेल व शाळा ताब्यात घेऊन येथे कोविड सेंटर उभारले जात आहेत. त्यामुळे कोविडची साखळी तुटुन पुढे कोविड रुग्ण वाढणार नाहीत.शहरातील सरकारी व खाजगी रुग्णालयात कमी पडणार नाही , असे प्रसाद यांनी सांगितले.


वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे म्हणाले , शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने जम्बो सिलेंडरची मागणी वाढली आहे.शहरात रोज १ हजार सिलेंडरची मागणी आहे.मात्र ,सध्या वैद्यकीय क्षेत्रात लागणारा गॅस मिळत आहे.नव्याने बसविण्यात आलेल्या टाकीमध्ये सहा हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होईल. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे ८६ बेड आहेत.तर २० आय सी यु बेड आहेत.त्यासाठी  हा गॅस साधारण पाच दिवस पुरणार आहे.मंगळवारी(दि १५)  टाकीमध्ये पहिला ऑक्सिजन टँकर भरला जाईल .त्यामुळे गॅसच्या टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.तर जम्बो सिलेंडर मध्ये गॅस मध्ये देखील गॅस शिल्लक राहणार आहे.त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनपासून वंचित राहावे लागणार नसल्याची ग्वाही देतो.

यावेळी  जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर ,उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ,तहसिलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी राहुल काळभोर,तालुका आरोग्य  अधिकारी डॉ मनोज खोमणे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद काळे आदी उपस्थित होते.
———————————

Web Title: Corona virus: Government and private hospitals in Pune will no longer be short of oxygen: Ayush Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.