Corona virus : मुंबईतून वडगाव निंबाळकरला आलेल्या आजींना कोरोना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:20 PM2020-05-19T13:20:29+5:302020-05-19T13:21:04+5:30

गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्ह कोरोना अहवाल आलेल्या रुग्णांचे  मुंबई 'कनेक्शन ' असल्याचे उघड

Corona virus : Grandmother who came to Wadgaon Nimbalkar from Mumbai is corona affected | Corona virus : मुंबईतून वडगाव निंबाळकरला आलेल्या आजींना कोरोना संसर्ग

Corona virus : मुंबईतून वडगाव निंबाळकरला आलेल्या आजींना कोरोना संसर्ग

Next
ठळक मुद्देगावात एक रात्र मुक्कामानंतर पुण्यात नेले होते उपचारासाठी 

बारामती : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात ५ वा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. तालुक्यातील मुर्टि पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात रुग्ण आढळला आहे. ७५ वर्षाच्या आजारी आजीबाई मुंबई येथिल रहिवासी आहेत . त्या त्यांच्या मुलीच्या घरी १५ मे रोजी सायंकाळी हवापालट करण्यास  आल्या होत्या .घरी आल्यावर श्वसनाचा त्रास वाढल्याने प्रकृती बिघडल्याने आजींना दुसऱ्याच दिवशी १६ मे रोजी ससून रुग्णालयात हलविण्यात आले.या ठिकाणी केलेल्या तपासणीत आजींना  कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात सापडलेला हा चौथा रुग्ण आहे. तर बारामती परिसरातील हा बारावा रुग्ण आहे. मात्र त्या केवळ एका रात्रीसाठी वडगाव निंबाळकर येथे मुक्कामी होत्या.दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्यात नेण्यात आले .त्या ठिकाणी केलेल्या तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बारामतीचा याचा काही संबंध नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमने यांनी ' लोकमत ' शी बोलताना दिली .
दरम्यान , बारामतीत आजपर्यंत दोन रुग्णांचा रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फल येथील रुग्णावर मुंबईत , तर माळेगाव आणि मूर्टि च्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत .दरम्यान , बारामतीत आजपर्यंत  दोन रुग्णांचा  रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फल येथील रुग्णावर मुंबईत , तर माळेगाव आणि मूर्टि च्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत .
बारामती शहर कोरोना मुक्त झाले आहे. मात्र पुणे मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला आहे .ग्रामीण भागात आता रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरवात झाली आहे .गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्ह कोरोना अहवाल आलेल्या रुग्णांचे  मुंबई 'कनेक्शन ' असल्याचे उघड झाले आहे .बाहेरून आलेल्या लोकांमुळे रुग्ण वाढण्याची भीती आहे .
बारावा रुग्ण सापडल्याने बारामती तालुका धस्तावला आहे.वडगाव येथील सर्व दुकाने, व्यवहार बंद करण्यात आली आहेत .सलग बारावा रुग्ण सापडल्याने बारामतीची  ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल सध्या तरी संपुष्टात आली आहे .बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे  कोरोनाचा धोका वाढणार आहे .

Web Title: Corona virus : Grandmother who came to Wadgaon Nimbalkar from Mumbai is corona affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.