कौतुकास्पद! भल्या भल्या देशांनी हात टेकले, पण पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:38 PM2021-05-26T20:38:45+5:302021-05-26T20:49:17+5:30

पुणे जिल्ह्यातील ४४२ ग्रामपंचायती झाल्या आत्तापर्यंत कोरोनामुक्त

Corona Virus: Great! No Corona in 48 villages of Pune district till date | कौतुकास्पद! भल्या भल्या देशांनी हात टेकले, पण पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

कौतुकास्पद! भल्या भल्या देशांनी हात टेकले, पण पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

Next

पुणे : भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीला पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील आपल्या गावात शिरकाव करून दिला नाही. या गावांमध्ये आता पर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसून, यातील बहुतेक सर्व गावे दुर्गम भागातील आहेत. दरम्यान जिल्ह्यातील  ४४२ ग्रामपंचायती आज अखेर कोरोना मुक्त झाल्या आहेत. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात ९ मार्च २०२० रोजी सापडला आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर एक महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागातून ग्रामीणभागात पसरला. त्यानंतर पहिल्या लाटेत ऑक्टोबर, सप्टेंबर महिन्यात संपूर्ण ग्रामीण भागात कोरोना महामारीची लागण झाली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर हजारो गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये मिळून जिल्ह्यातील १३५५  ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाची बाधा झाली. तरीदेखील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावे देखील कोरोना मुक्त व्हायला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये आतापर्यंत २लाख ६० हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत.  त्यातील दोन लाख 21 हजार 653 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे सद्यस्थितीत ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक बाधित रुग्ण हवेली तालुक्यात असून त्यांची संख्या ६० हजारांपर्यंत गेली आहे तर त्याखालोखाल ३० हजार रुग्ण खेड तालुक्यात आहे. दाखल रुग्णांची संख्या खेड तालुक्यात चार हजारांपेक्षा जास्त सोडून जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Web Title: Corona Virus: Great! No Corona in 48 villages of Pune district till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.