Corona virus : हॅलो, परदेशातून एक जण आलाय, त्याला घेऊन जा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 08:05 PM2020-03-18T20:05:41+5:302020-03-18T20:06:48+5:30

आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन ऐवजी पोलिसांनाच केला जातोय कॉल...

Corona virus: Hello, a man comming from foreign, take him ... | Corona virus : हॅलो, परदेशातून एक जण आलाय, त्याला घेऊन जा...

Corona virus : हॅलो, परदेशातून एक जण आलाय, त्याला घेऊन जा...

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाची भीती : पोलिसांची डोकेदुखी वाढली

पिंपरी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणांकडून उपाययोजना करण्यात येत असून, आरोग्य विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी, सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस ठाण्यात फोन करण्यात येत आहेत. हॅलो, परदेशातून एक जण आलाय, त्याला घेऊन जा... असे सांगून नागरिक पोलिसांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
   कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण देशात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. त्यात पुणे व पुण्यात पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराकडे सर्व यंत्रणांचे लक्ष लागून आहे. सर्व यंत्रणांनी सजग राहून दक्षता घेण्याचे निर्देश शासन व आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अत्यंत महत्त्वाच्या व आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. परदेशी पर्यटक व विमान प्रवास करून आलेल्या नागरिकांची माहिती देण्यात यावी, असा आदेश हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस व टूर्स अ?ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच  ह्यकोरोनाह्णबाबत सहज मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांकडून हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला असला तरी, सामान्य नागरिकांकडून त्याचा वापर होताना दिसून येत नाही. बुधवारी (दि. १८) सायंकाळी सातपर्यंत एकही ह्यकॉलह्ण या हेल्पलाइनवर आला नव्हता. मात्र शहरातील काही पोलीस ठाण्यांतील क्रमांकावर काही नागरिकांनी मदतीसाठी कॉल केले. आमच्या सोसायटीतील नागरिक परदेशात गेला होता. तो आला आहे, त्याला घेऊन जा, असे संबंधित नागरिकांकडून पोलिसांना सांगण्यात येत होते. आरोग्य विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मग तुम्ही काय करताय, आम्ही कसे रहायचे, तुम्हीच सांगा त्यांना, असे कॉल करणाºया नागरिकांकडून पोलिसांना सांगण्यात येत होते. 
नागरिकांनी ह्यकॉलह्ण केल्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र परदेशातून आलेला नागरिक कोरोनाग्रस्त आहे किंवा नाही, याबाबत साशंकता असल्याने त्याला ताब्यात घेण्याची पुरेशी यंत्रणा नसल्याने पोलिसांची अडचण झाली. आरोग्य विभागाने निर्देशित केल्यानुसार ह्यसुरक्षा किटह्ण नसल्याने पोलीस संबंधित नागरिकाजवळ जाण्याचे टाळत आहेत. आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली.

हॅलो, मी दुबईतून आलोय....
दुबई येथून आलेल्या एका नागरिकाने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी १०० क्रमांकावर ' कॉल ' केला. हॅलो, मी दुबईतून आलोय, काय करू, मला मदत करा, असे संबंधित नागरिकाने सांगितले. त्यानुसार नियंत्रणक कक्षातून पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर त्याला ह्यकनेक्टह्ण करून देण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावरून मदत घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करण्याच्या ' त्या' नागरिकाला सूचना देण्यात आल्या.

Web Title: Corona virus: Hello, a man comming from foreign, take him ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.