Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात गुरुवारी आजवरची सर्वाधिक १८१२ कोरोना रूग्णांची वाढ; एकूण संख्या ३१ हजार ८८४

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:05 AM2020-07-17T11:05:47+5:302020-07-17T11:06:24+5:30

दिवसभरात बरे झालेल्या ७६४ जणांना घरी सोडण्यात आले घरी

Corona virus : The highest ever increase of 1812 patients in Pune city; total number on 31thousand 884 | Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात गुरुवारी आजवरची सर्वाधिक १८१२ कोरोना रूग्णांची वाढ; एकूण संख्या ३१ हजार ८८४

Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात गुरुवारी आजवरची सर्वाधिक १८१२ कोरोना रूग्णांची वाढ; एकूण संख्या ३१ हजार ८८४

Next
ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ५३६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी आजवरची सर्वाधिक १ हजार ८१२ रूग्णांची भर पडली असून यामध्ये रॅपिड अँटिजेन किटद्वारे निष्पन्न झालेल्या ४८५ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३१ हजार ८८४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ७६४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५३६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ६४४ झाली आहे.
गुरूवारी रात्री साडे दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १३२७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात २६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १११८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १८३ रुग्ण दाखल झाले आहेत. तर, पालिकेच्या विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणीत निष्पन्न झालेले ४८५ रुग्ण असे एकूण १८१२ रुग्ण वाढले आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
दिवसभरात १७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ९०६ झाली आहे. दिवसभरात एकूण ७६४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ५८० रुग्ण, ससूनमधील ०७ तर  खासगी रुग्णालयांमधील १७७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २० हजार ३३४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १० हजार ६४४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६१३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ८४ हजार ६९७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे २ हजार ९६९ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही मिळून एकाच दिवसात ६ हजार ५८२ जणांची तपासणी दिवसभरात करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus : The highest ever increase of 1812 patients in Pune city; total number on 31thousand 884

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.