Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; दीड हजाराहून अधिक रूग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:53 PM2021-03-11T19:53:23+5:302021-03-11T20:13:28+5:30

पॉझिव्हिटी रेट साडेसतरा टक्क्यांवर कायम 

Corona Virus : Highest Increased corona patients n Pune city on Thursday; More than one and a half thousand patients | Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; दीड हजाराहून अधिक रूग्ण

Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; दीड हजाराहून अधिक रूग्ण

Next
ठळक मुद्दे७३९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची ऑक्टोबरनंतर प्रथमच उच्चांकी वाढ दिसून आली असून, गुरूवारी दिवसभरात तब्बल १ हजार ५०४ नवे कोरोनाबाधित आढळून आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ही रेट साडे सतरावर कायम असून, आजही ही टक्केवारी १७.५८ टक्के इतकी आहे.

आज दिवसभरात या आठवड्यातील कोरोना संशयितांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून, महापालिकेच्या दीड हजार तपासण्यांसह खासगी प्रयोगशाळा मिळून ८ हजार ५५३ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे.  

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या साडेआठ हजाराच्या पुढे गेली आहे. आजमितीला शहरात ८ हजार ५४१ रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ७३९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त ३५७ रूग्ण हे गंभीर आहेत. 

शहरात आजपर्यंत १२ लाख २० हजार ९०० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख १३ हजार २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९९ हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत.  शहरात कोरोनामुळे ४ हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला आहे. 
                ===============

Web Title: Corona Virus : Highest Increased corona patients n Pune city on Thursday; More than one and a half thousand patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.