Corona virus : लॉकडाऊनमधील नैराश्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाची गळफास घेत आत्महत्या,धायरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:39 PM2020-06-25T13:39:51+5:302020-06-25T13:42:12+5:30

लॉकडाऊनमध्ये चार महिने हॉटेल बंद

Corona virus : Hotel manager commits suicide due to depression in lockdown,Dhayari incidents | Corona virus : लॉकडाऊनमधील नैराश्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाची गळफास घेत आत्महत्या,धायरी येथील घटना

Corona virus : लॉकडाऊनमधील नैराश्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाची गळफास घेत आत्महत्या,धायरी येथील घटना

googlenewsNext

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका हॉटेल व्यवस्थापकाने हॉटेल मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.

प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय: ४३ वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून हॉटेल राज चालवत होते. लॉक डाऊन मुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होते. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर  सदर घटना उघडीस आली. घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्याने मी आत्महत्या करीत असून माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यात लिहिले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

Web Title: Corona virus : Hotel manager commits suicide due to depression in lockdown,Dhayari incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.