Corona virus : पुणे विभागात १३५ रूग्णांची वाढ; मृत्यूची संख्या ४ ने वाढली : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 09:09 PM2020-04-23T21:09:31+5:302020-04-23T21:12:44+5:30

आजपर्यत विभागामध्ये एकुण ११ हजार ७०७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Corona virus : Increase of 135 patients in Pune division; The death rise by four : Dr. Deepak Mhaisekar | Corona virus : पुणे विभागात १३५ रूग्णांची वाढ; मृत्यूची संख्या ४ ने वाढली : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Corona virus : पुणे विभागात १३५ रूग्णांची वाढ; मृत्यूची संख्या ४ ने वाढली : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Next
ठळक मुद्देएकूण बाधित १०३१, मृत्यूू एकूण ६५आजपर्यंत विभागामधील ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे:- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार ३१ झाली आहे. बुधवारपेक्षा १३५ ने बाधीत रूग्णसंख्या वाढली.आहे. गुरूवारी दिवसभरात ४ जण म्रुत्यूमूखी पडले. एकूण संख्या पुणे विभागात आता ६५ झाली आहे. विभागात १७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकुण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत,  विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.
   आजपर्यत विभागामध्ये एकुण ११ हजार ७०७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ हजार ४६ चा अहवाल प्राप्त झाल असून ६६२ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ९ हजार ९६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून१ हजार ३१ चा अहवाल  पॉझिटिव्ह आहे.
     आजपर्यंत विभागामधील ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १ कोटी ८२ लाख ७१ हजार ८५७ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९२७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे
     पुणे जिल्हा: बाधित ९३६, मृत्यू ५९. 
     सातारा: बाधित २१ रुग्ण मृत्यू २.
     सोलापूर: बाधित ३७ रुग्ण मृत्यू ३. 
     सांगली: बाधित २७ रुग्ण, मृत्यू १. 
     कोल्हापूर: बाधित १०, मृत्यू ०

Web Title: Corona virus : Increase of 135 patients in Pune division; The death rise by four : Dr. Deepak Mhaisekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.