Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ७७३ कोरोनाबधितांची वाढ; १६८० जण बरे होऊन परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:52 PM2020-08-27T21:52:22+5:302020-08-27T22:01:02+5:30
आतापर्यंत शहरात ७१ हजार ९४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पुणे : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ६८० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ७७३ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १९ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ८१८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी ४९६ जण व्हेंटिलेटरवर आहेत़. तर २ हजार ७५० रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत शहरात एकूण ८९ हजार ०९० जण कोरोनाबाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ९९५ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ७१ हजार ९४९ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत २ हजार १४६ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ६ हजार ९२नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ४ लाख २६ हजार ५५० वर गेला आहे़
------