Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ; ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 10:01 PM2020-09-17T22:01:26+5:302020-09-17T22:02:01+5:30

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३७२ झाली आहे.

Corona Virus : An increase of 1,964 corona victims in Pune city on Thursday; 62 died | Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ; ६२ जणांचा मृत्यू

Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ; ६२ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे दिवसभरात २ हजार २१९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी..

पुणे : शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून दिवसभरात २ हजार २१९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवभरात ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १७ रूग्ण पुण्याबाहेरील होते. 
         पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९३९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४७९ व्हेंटिलेटरवर, ४६० आयसीयू मध्ये तर ३ हजार ४७५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते. 
      शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख २६ हजार ५३७ झाली असून, आतापर्यंत १ लाख ६ हजार १९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३७२ झाली आहे़
     आज दिवसभरात ६ हजार ५४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ५६ हजार ६५७ इतकी झाली आहे.    

Web Title: Corona Virus : An increase of 1,964 corona victims in Pune city on Thursday; 62 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.