Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार १२० नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ६५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:06 PM2020-09-17T13:06:23+5:302020-09-17T13:11:34+5:30
दिवसभरात १ हजार ८८३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी..
पुणे : शहरात बुधवारी २ हजार १२० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, दिवसभरात १ हजार ८८३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आज दिवभरात ६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ रूग्ण पुण्याबाहेरील होते़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९३६ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४८० व्हेंटिलेटरवर, ४५६ आयसीयूमध्ये तर ३ हजार ४५३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते.
शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख २४ हजार ५६८ झाली असून, आतापर्यंत १ लाख ३ हजार ७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ६७२ झाली आहे़
आज दिवसभरात ७ हजार १६२ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ५० हजार १०८ इतकी झाली आहे.
-------------------