Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 09:14 PM2020-12-31T21:14:51+5:302020-12-31T21:16:38+5:30

पुणे शहरात १ लाख ७० हजार ८२१ जण कोरोनामुक्त..

Corona virus : Increase of 229 corona patients in Pune city on Thursday; 421 became corona free | Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे 

Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे 

Next
ठळक मुद्देशहरात आजपर्यंत ९ लाख १७ हजार १९५ जणांची कोरोना तपासणी

पुणे : शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४२१ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ८१९ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़९ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २४६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६३४ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ३१७ इतकी आहेत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून,यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६३१ इतकी झाली आहे.

शहरात आजपर्यंत ९ लाख १७ हजार १९५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७८ हजार ७६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. यापैकी १ लाख ७० हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Corona virus : Increase of 229 corona patients in Pune city on Thursday; 421 became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.