Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ५३१ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण संख्या १४ हजार १८५
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:30 AM2020-06-26T11:30:16+5:302020-06-26T11:30:45+5:30
शहरातील स्वाब चाचणी पोहचली १ लाखांच्या घरात
पुणे : महापालिकेने सुरू केलेल्या स्वाब चाचण्यांचा आकडा एक लाखाच्या पार गेला आहे. शहरात गुरूवारी दिवसभरात ५३१ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १४ हजार १८५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २०२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३१६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ५ हजार ३२५ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
गुरुवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५३१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २२६ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३१६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २५३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात गुरूवारी १३ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५५८ झाली आहे. दिवसभरात एकूण २०२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४२ रुग्ण, ससूनमधील ०६ तर खासगी रुग्णालयांमधील ५४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ३०२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ५ हजार ३२५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४५३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ६७७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.