Corona virus : पुणे शहरात शनिवारी १८३८ नवीन कोरोना बाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:33 AM2020-07-19T01:33:22+5:302020-07-19T01:33:52+5:30
विविध रुग्णालयात उपचार घेणारे एकूण ५४७ रुग्ण अत्यवस्थ
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनिवारी १ हजार ८३८ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३५ हजार ८७८ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ७७४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५४७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार ६२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५४७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
दिवसभरात १८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ९३५ झाली आहे. दिवसभरात एकूण ७७४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २१ हजार ८८१ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १३ हजार ६२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ९८१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ९८ हजार ४८९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.