Corona Virus : पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:59 PM2020-08-11T20:59:35+5:302020-08-11T21:01:07+5:30

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा दिल्या...

Corona Virus : More than Rs 1.5 lakh will be paid to the hospital only after the committee's permission in pune | Corona Virus : पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार

Corona Virus : पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार

Next
ठळक मुद्देशहरामध्ये 52 पेक्षा अधिक खासगी हॉस्पिटल;त्यापैकी त्यापैकी दहा कोविड हॉस्पिटल

पुणे : पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना खाजगी रुग्णालयांकडून प्रचंड बिल लावून नागरिकांची लूट सुरू आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा देण्यात आल्या असून, बिलांची तांत्रिक तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
याबाबत राव यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून अधिकचे बील घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठीच प्रशासनाने 8 उपजिल्हाधिकारी , 28 ऑडिटर आणि 4 डॉक्टर यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दीड लाखांपेक्षा अधिक बील रुग्णाला दिल्यास एक तासाच्या आत या बिलाची तपासणी करून योग्या आहे किंवा आक्षेप असतील तर तसे स्पष्ट करेल. त्यानंतरच संबंधित रुग्णांने बील पेड करायचे आहे. यात आतापर्यंत या समितीकडे 83 तक्रारी आल्या असून, 11 प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व प्रकरणांची तांत्रिक तपासणी करुन दोषी आढळून येणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. 
---- 
शहरातील 10 खाजगी हॉस्पिटला संपूर्ण कोविड हॉस्पिटल 
शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या 24 ऑगस्ट पर्यंत शहरातील खाजगी 10 हॉस्पिटलने संपूर्ण कोविड हॉस्पिटल म्हणून जाहिर करावे अशा नोटिसा पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल, केईएम, जहांगीर, पुना हॉस्पिटल, देवयानी, इनलॅक्स बुदराणी, एमस, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रुबी हॉस्पिटलचा समावेश आहे. यामध्ये शहरामध्ये 52 पेक्षा अधिक खासगी हॉस्पिटल असून यापैकी केवळ दहा हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करत आहोत. यामुळे नॉन कोविड रुग्णांच्या उपचार मिळने कठीण होईल, असे म्हणणे चुकीचे असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Corona Virus : More than Rs 1.5 lakh will be paid to the hospital only after the committee's permission in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.